छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने सावरी (बिड) येथे सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन
सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा आयोजक प्रहार सेवक विनोद उमरे.
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
प्रहार जनशक्ती पक्ष चिमूर शाखा सावरी बिडकर यांच्या वतीने जि.प.प्रथमिक शाळा सावरी (बिड) येथिल वर्ग ४ व ५ वर्गातील विद्यार्थी यांची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली या स्पर्धे मध्ये ४५ विद्यार्थीनीं स्पर्धा परीक्षा भांग घेतला या स्पर्धेचे आयोजक प्रहार जनशक्ती पक्षचे प्रहार सेवक ,चेतन खोब्रागडे, अनिकेत इंगोले,मुरलीधर रामटेके, नारायण निखाडे, सचिन घानोडे,आदीत्य इंगोले, स्वप्निल खोब्रागडे हे आयोजक होते.
शिवजयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षाचे
अध्यक्ष :- विलास हिंवज सर
जि.प.उच्च प्राथमिक शाळा सावरी येथिल उच्च श्रेणी मुख्याध्यापक
उद्घाटक :- गुणवंत कारेकार
जि. परिषद चंद्रपूर माजी अर्थ बांधकाम सभापती
प्रमूख उपस्थित :- अभिजित कारेकार भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते
प्रमूख पाहुणे:-रवि भाऊ शेंडे
ग्रा.प.सावरी माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य. संदीप निखाडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष. विलास भाऊ वाकडे माजी तंटामुक्ती अध्यक्ष . संदीप ढवस,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य , प्रहार सेवक रमेश वाकडे, कैलास वाकडे व गावकरी उपस्थित होते.