ताज्या घडामोडी

रक्ताचा तुडवडा लक्ष्यात घेता गोंडपीपरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

शहर प्रतिनिधी :प्रमोद दुर्गे गोंडपीपरी

सुशीलाबाई रामचंद मामीडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर व चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स गोंडपीपरी यांच्या संयुक्त विद्यमाने
राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले ,व विश्वरत्न परमपूज्यनिय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज दिनांक 11 एप्रिल रोज रविवारला स्व.लक्ष्मणराव कुंदो जवार कनिष्ठ महाविद्यालय गोंडपीपरी येथे रक्ताचा तुडवडा लक्ष्यात घेता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . यात दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण 30 रक्तदात्यांनी रक्तदान केले .
महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ व हार अर्पण करून रक्तदानाच्या शिबिराला सुरवात करण्यात आली. आयोजकांच्या वतीने प्रमुख पाहुन्याचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मा. संदीप धोबे ठाणेदार गोंडपीपरी, मा. महेंद्रसिंग चंदेल संस्थापक अध्यक्ष गोंडपीपरी शहर विकास आघाडी , सूरज भाऊ माडूरवार संस्थापक अद्यक्ष गोंडपीपरी यंग ब्रिगेड यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. रक्तदान शिबिरात सहभाग घेतलेल्या रक्तदात्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते
शाल ,श्रीफळ व प्रमाणपत्र देउन सत्कार करण्यात आला.
गोंडपीपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा. संदीप धोबे साहेबानी सुद्धा रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले
हे विशेष!

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close