ताज्या घडामोडी
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिना निमित्य खातोडा गावामध्ये मास्क व सॅनिटायझर चे वितरण

ग्रामीण प्रतिनिधी :वृषभ कामडी मोटेगाव
संपूर्ण देशात कोरोना विषाणूंने थैमान घातले असून राज्यात त्यांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे यावर प्रतिबंधक ऊपाय म्हणून राज्य शासनाने संपूर्ण राज्यात 15/04/2021 पासून संचारबंदी लागू केली आहे सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव शहरपाठोपाठ ग्रामीण भागामध्ये पण पसरलेला आहे तेव्हा गावामध्ये विषानुबाबत जागृती करणे गरजेचे आहे म्हणुन ग्राम पंचायत गोंदोडा चे करर्तव्यदक्ष सदस्य श्री गणेश भांडारकर यांनी डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधुन ग्राम पंचायत गोंदोडा मध्ये येत असलेल्या खातोडा गावामध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देत मास्क व सॅनिटायझर चे वितरण केले व कोरोना विषाणू बाबत जण जागृती केली.