लाखनीत पोटनिवडणूकीत 21 जागांपैकी 7 अविरोध
पोहरा प्रभाग क्रमांक 5 व गराडा प्रभाग क्रमांक 1 मध्ये नामनिर्देशन नाही
मुरमाडी/तुप प्रभाग क्रमांक 3, सावरी प्रभाग क्रमांक 3 नामाप्र मुळे निवडणुक रद्द
प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी
लाखनी तालुक्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्याचा मृत्यू तर काही अतिक्रमणामुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता. 11 ग्रामपंचायतीच्या 15 प्रभागातून 21 ग्रामपंचायत सदस्य निवडून द्यायचे होते. या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात आचारसंहिता सुरू झाली आहे.
सावरी, गराडा, घोडेझरी, मचारणा, मिरेगांव, मुरमाडी/तुप प्रत्येकी 1, पोहरा 3, रामपुरी 2, देवरी 5, खेडेपार 3 व रेंगेपार/कोहळी 2 इत्यादी ग्रामपंचायत मध्ये रिक्त जागांसाठी पोट निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी आरक्षित करण्यात आलेल्या सावरी प्रभाग क्रमांक 3 आणी मुरमाडी/तुप प्रभाग क्रमांक 3 मधील निवडणूक सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगणादेशामुळे स्थगित करण्यात आली आहे. तसेच पोहरा प्रभाग क्रमांक 5 आणि गराडा प्रभाग क्रमांक 1 येथे कोणीही नामनिर्देशन पत्र भरलेले नाही तर सात जागेसाठी एकच नामांकन असल्यामुळे अविरोध निवडून आले आहेत.
हे आहेत अविरोध निवडून आलेले उमेदवार (चौकट)
खेडेपार 1.अनु, जमाती हेमराज मडावी 2. अनु, जमाती महिला रागिणी परतूकी. देवरी 1. सर्वसाधारणपणे महिला संगीता निपुरू 2. अनु, जाती महिला सुवर्णा मेश्राम. रामपुरी अनु, जमाती जयदेव वाडीवे, मचारणा सर्वसाधारण भास्कर बाते, घोडेझरी अनु, जाती महिला जयमाला दामले.
पोहरा प्रभाग क्रमांक 5 वासीयांचा ग्रा.प. पोट निवडणूकीवर बहिष्कार (चौकट)
पोहरा प्रभाग क्रमांक 5 मध्ये मेंढा आणि गडपेंढरी या गावांचा समावेश होत असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी अशा 3 जागा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत पण येथील नागरिकांनी स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या मागणीसाठी जानेवारी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता तोच डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणूकीवर कायम असल्यामुळे कोणीही नामनिर्देशन पत्र भरलेले नाही.