वेनलाया येथे पूल वजा बंधाऱ्याचे जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
जि.प.सिंचाई विभागाकडून 55 लक्ष रु.निधी मंजूर
वेनलाया येथील शेतकरी होणार सुजलाम -सुफलाम
सिरोंचा तालुक्यातील व्येंकटापूर ग्राम पंचायत अंतर्गत वेनलाया येथे गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत सिंचाई विभागाकडून पूल वजा बंधारा बांधकामासाठी 55 लक्ष रु.निधी मंजूर झाल्याने या बांधकामाची भूमिपूजन सोहळा जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शनिवारी पार पडला.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कंकडालवार हे शनिवारी सिरोंचा तालुका दौऱ्यावर आले असता त्यांच्या हस्ते वेनलाया येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडला.
यावेळी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांनी वेनलाया येथील आदिवासी बांधव व शेतकऱ्यांसोबत चर्चा केले.वेनलाया येथील गावकऱ्यांनी विविध समस्या जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांच्या समोर मांडले असता कंकडालवार यांनी सर्व समस्या मार्गी लावण्याचे ग्रामस्थांना आश्वासन दिले.
वेनलाया येथे पूल वजा बंधाऱ्याचे भूमिपूजन सोहळा प्रसंगी जि.प.अध्यक्ष कंकडालवार यांचे समवेत आविस तालुका बानय्या जनगाम,सरपंच अजय आत्राम,सडमेक बापू,सुधाकर पेद्दी, आविस सल्लागार रवी सल्लम,उपसरपंच मंजूला दिकोंडा,ग्राम पंचायत सदस्य तुळशीराम गुरनुले, रंजना शिडाम, पोसक्का गड्डी,पेंटीं तलांडी,दुर्गय्या तलांडी,अंकुलू जनगम, वेंकटस्वामी कारसपल्ली, चिंना पेंटा तलांडी,केशव मडे,पोरीया तलांडी,बापूराव चंद्रगिरी,सुधाकर चंद्रगिरी,साई मंदा,सोमा वेलादी,गुप्ता वेलादी,दुग्गा वेलादी, किरण वेमुला,जंपाय्या गोमासे,नारायण मुडमडगेला,गणेश रच्चवार,ब्रह्मय्या कावरे,श्रीनिवास दिकोंडा,गोपाल गड्डी,अल्लूरी सडवली,इरफा तलांडी आदी उपस्थित होते.