ताज्या घडामोडी

सृजन मराठी साहित्य परिषदेच्या नागपूर विभागीय समन्वयकपदी ऍड.भूपेश पाटील यांची निवड

उपसंपादक:विशाल इन्दोरकर

सृजन मराठी साहित्य परिषद राज्यभर साहित्य, संस्कृती आणि सृजनशीलतेची व्यापक चळवळ उभी करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. नव्या समन्वयकांच्या नेतृत्वाखाली विविध साहित्यिक उपक्रम, कवी संमेलने, कथाकथन, चर्चासत्रे, वाचन चळवळ आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्यक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार आहेत.
राज्यातील सर्व साहित्यिक, कवी, लेखक, पत्रकार, वाचक आणि मराठी भाषाप्रेमींनी या साहित्यिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवावा,असे आवाहन नागपूर विभागीय समन्वयक ऍड. भूपेश पाटील यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close