ताज्या घडामोडी

विवाहित प्रेयसीचा तीच्या प्रीयकरानेच चाकूने गळा कापुन केला खून

तालुका प्रतिनिधी : कु. कल्यानी मुनघाटे नागभीड

नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत नागभीड शहरातील चवळेश्वरी मंदिर परिसरात कीरायाच्या घरात राहणारे विवाहित प्रेयसीचा तीच्या प्रीयकरानेच चाकूने गळा कापुन खूण केला . ही थरकाप उहडनारी घटना दि. १४ ऑगस्ट ला सकाळी १०:३० च्या सुमारास उघडकीस आली. म्रुतक महिलेचे विवाह पूर्वी चे नाव पुजा रविंद्र सलामे (२८) रा. नागभीड असे आहे . या महिलेचा अगोदरच एका मुलासोबत विवाह झाला होता. परंतु काही कारणास्तव यांचा घटस्फोट झाला, अशा चर्चा आहेत. पुजा पतीपासून विभक्त असल्याने आईकडे राहत होती . पुजा व आई या दोघ्या मायलेकी चवळेश्वरी मंदिर परिसरात भाड्याने राहत होत्या. दरम्यान पुजा सलामे व विवेक ब्रम्हदार चौधरी(२६) रा. चीखलपरसोडी यांचे प्रेमसंबंध जुडले . संबंध असल्यामुळे विवेक अनेकदा पुजा च्या घरी जायचा, काही दिवसांनी दोघांचे वाद होउ लागले, नेहमी प्रमाणे काल सुद्धा वाद झाला होता. विवेक ने काल सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास पुजा ची आई गेल्याची संधी साधून घराच्या मागचे दार जबरदस्तीने उघडून प्रवेश केला. अचानक पुजा ला पकडून तीच्या मानेवर चाकूने सपासप वार केला, चाकूने वार इतक्या वेगाने केला की, यात पुजा चा जागीच मृत्यू झाला . लगेच पुजा ची आई घरात आली तेव्हा विवेक हा रक्ताने भरून पुजा ला आपल्या मांडीवर घेऊन बसला होता, आई ने बघताच विवेक ने तिथून पड काढला, व स्वताच नागभीड पोलीसांच्या स्वाधीन झाला. आईने घटनेची माहिती पोलीसांना दिली, पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा व शवविच्छेदन करून प्रेत नातेवाईकांकडे दिले. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी मिलद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागभीड पोलीस करीत आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close