ताज्या घडामोडी

श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार येथे बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन

प्रतिनिधी:रामचंद्र काम

चिमूर तालुक्यातील सरडपार येथे चिमूर तालुका राष्ट्रसंत तत्वज्ञान प्रचार व प्रसार समिती तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 12 मे 2026 ते 19 मे 2026 या कालावधीत श्री गुरुदेव बाल सुसंस्कार शिबिराचे आयोजन केलेले आहे.

साने गुरुजींच्या विचारावर लक्ष केंद्रित करून आजच्या बालकात उठण्या- बसण्या बोलण्यापासून प्रत्येक कामाची शिस्त, टापटीप, सभ्यता, वडीलधाऱ्यांचा आदर, आज्ञापालन व नम्रता, सार्वजनिक जीवनात सेवावृत्ती साधन, सुचिता यासाठी व्यसन निर्मूलन, सद्गुण, संवर्धन व उत्तम कलागुणांनी युक्त, वेळेचा सदुपयोग, व्यवहारात तारतम्य असा बालकांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यासाठी सदर शिबिराचे आयोजन केलेले आहे

सदर शिबिरात बौद्धिक व आध्यात्मिक, सुसंस्कार ज्ञान, प्रार्थना, सफाई, रामधुन, थोरांचेचरित्र, व्यक्तिमत्व विकास, ग्रामगीता, आयुर्वेदिक चिकित्सा, लेझीम, योगासने, प्राणायम, जुडो कराटे लाटीकाठी, मलखांब, भजन संगीत, खंजिरी, तबला, हार्मोनियम इत्यादी विषयावर मार्गदर्शन व सराव होणार आहे.

तरी सदर शिबिराचा लाभ बालकांनी घेण्याचे आवाहन चिमूर तालुका राष्ट्रसंत तत्वज्ञान प्रचार व प्रसार समिती तथा श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार यांनी केलेले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close