ताज्या घडामोडी

नेरीच्या युवकांचा श्रमदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुख्य संपादक:कु. समिधा भैसारे

आदर्श नेरीच्या निर्मितीसाठी सुरू करण्यात आलेल्या “गावासाठी एका तासाचे श्रमदान” उपक्रमाला नेरीतील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पावसाची पर्वा न करता युवकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेरी येथे श्रमदान केले.

श्रमदानापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी युवकांनी परिसरातील दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधून आपले दुकान व परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले.

“एक तास गावासाठी… एकत्रित प्रयत्नांतून आदर्श नेरी!” या संकल्पनेला मिळालेला हा प्रतिसाद नेरीच्या नव्या परिवर्तनाची आशादायी सुरुवात ठरत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *