ताज्या घडामोडी

श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी हे बहुआयामी व्यक्तिमत्व- विजयेंद्र चौधरी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

माजलगाव- श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे त्यानिमित्ताने भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेने शैक्षणिक, बौध्दिक, सामाजिक अशा विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान प्रसंगी व्याख्याते तथा उपमुख्याध्यापक विजयेंद्र चौधरी यांनी श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचे जीवन कार्याविषयी माहिती देताना सांगितले की, श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांनी संघटन, सामाजिक, कामगार, कृषी यासह विविध क्षेत्रात प्रसिध्दी पासून कोसो दूर राहून काम केले होते. किसान मजदूर संघ सारखे संघटन उभे केले व संघ परिवारातील विविध कार्यक्षेत्राचे काम आजही त्याच गतीने किंबहुना त्यापेक्षाही अधिक वेगाने चालू आहे. कामगारांच्या, शेतकरी कष्टकरी यांच्या प्रश्नांना वाचा फोडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी होते. देशाच्या विविध भागात, विविध भाषा असलेल्या प्रदेशात जावून देशहितासाठी कार्य त्यांनी केलेले आहेत. याची सांगड विजयेंद्र चौधरी यांनी शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांच्या कामाशी जोडताना आपली संस्था असे उपक्रम व कार्यक्रम वारंवार घेते त्यातून शैक्षणिक अनुभुती घेऊन त्या विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित करुन त्यामधून आपलाही व्यक्तिमत्व विकास साधला पाहिजे. आपल्या कार्य कर्तृत्वामध्ये शिक्षकांनी श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांना आदर्श मानून कार्य केले पाहिजे असे सांगितले.
यावेळी अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी तर व्यासपीठावर पर्यवेक्षक उमेश थाटकर सर, रवींद्र खोडवे सर, मिलिंद वेडे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी यांनी सांगितले की, श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचे विचार व कार्य यांचा आदर्श समोर ठेवून आपण त्यांचा एक तरी गुण अंगिकारावा यासाठी संस्था परिवार क्षेत्रातील विविध महापुरुषांच्या जन्मशताब्दी वर्ष साजरे करताना विविध उपक्रम घेत असते. तसेच शैक्षणिक कामे, मासाखेर कामे, प्रशासनाच्या आदेशानुसार ‘माझे विद्यार्थी माझी जबाबदारी’ निरंतर शिक्षण या मोहिमे विषयी माहिती दिली.
या कार्यक्रमाची सांघिक पद्याने झाली, सांघिक पद्य श्रीमती स्मिता पांडे यांनी सांगितले, प्रास्ताविक, परिचय, सुत्रसंचालन व आभार उमेश थाटकर सर यांनी आभार मानले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close