सिरोंचा नगर पंचायतीचा विकास रॅकेटच्या वेगाने करू: -माजी आमदार दिपकदादा आत्राम
.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
सिरोंचा उध्या होणाऱ्या नगर पंचायत निवडणुकीत आविस ला बहुमताने विजयी मिळवून दिल्यास सिरोंचा नगर पंचायतच्या विकास रॅकेटच्या वेगाने करू असे प्रतिपादन माजी आमदार दिपकदादा आत्राम व जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रचार दरम्यान उपस्थित मतदारांना सांगितले आहे. सिरोंचा शहर हे पूर्वी ग्राम पंचायत होता.ग्राम पंचायत मधून नगर पंचायतमध्ये रूपांतर झाल्या असल्या तरी पाहिजे तेवढा विकास झाली नाही. गेल्या वर्षीचा निवडणुकीत विजयी होऊन नगरसेवक बनलेले पुढारी सिरोंचा शहराला विकास करण्यास असफल ठरले असून सिरोंचा शहरात अनेक समस्या कायम आहेत.यामध्ये रस्ते,वीज,पाणी,आरोग्य हे समस्या प्रामुख्याने असुन ह्या समस्यांच्या निराकरण पाहिजे असेल तर अविसच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा,आविस सिरोंचा शहरातील प्रत्येक समस्यांचा निकाली काढून शहराला स्मार्ट सिटी बनवू असे प्रतिपादन आविस नेते,माजी आमदार दिपकदादा आत्राम,जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी केले आहे.
सिरोंचा नगर पंचयातमध्ये अविसच्या वतीने नगरसेवक पदासाठी उमेदवार उभे केले असून अविस पक्षाचे टेबल व कपबशी या बोधचिन्ह वर तुमच्या मोल्यावन मत देऊन अविसच्या उमेदवारांना विजयी करण्याचे विनंती आदिवासी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष बानय्या जनगामनी केले आहे.
अविसच्या एकाच वादा..सिरोंचा शहर विकासाचा नारा