तपोभूमी गोंदेडा येथे ऋषीपंचमी निमित्ताने सत्संग पर्व संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
राष्ट्रसंत साहित्य प्रचार व प्रसार समितीच्या वतीने ऋषीपंचमीच्या पर्वावर तपोभुमी गोंदेडा येथे एक दिवसीय आध्यात्मिक सत्संग चिंतन पर्व व स्नेह भेट आयोजित करण्यात आला.याकरीता चिमुर,सिंदेवाहि, ब्रम्हपुरी, भंडारा, नागपूर, वरोरा या तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रचारक यांची उपस्थिती होती दि.15सप्टें, सायं सामुदायिक प्रार्थनेने व पुजनाने सुरुवात झाली याप्रसंगी प्राचार्य

महादेवरावजी पिसे सरांनी चिंतन व्यक्त केले प्रार्थनेने नंतर ऋषीपंचमीचे महत्व, गुरुदेव सेवा मंडळ काळाची गरज या विषयावर ग्रामगीताचार्य डॉ राम गभणे यांनी चिंतन व्यक्त केले.त्याचप्रमाणे सावरकर सरांनी, सचिन महाराज यांनी विचार व्यक्त केले.रात्री सहभोजनाचा आनंद घेऊन सर्वांनी भजन प्रबोधनाचा आनंद घेतला दि.16ला सामुदायिक ध्यान प्रसंगी चंद्रभान शेंडे सरांनी चिंतन व्यक्त केले.सामुदायिक ध्यानानंतर आध्यात्मिक चिंतन दयारामजी कन्नाके यांनी व्यक्त केले.सर्वांचा परीचय घेऊन जयघोष घेऊन अल्पोपहाराने सांगता झाली.

याप्रसंगी प्रा.मिलींद सुफले सर,भोयर सर व अनेक कार्यकर्ते, प्रचारक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गजानन ठाकरे यांनी केले तर प्रस्ताविक व व्यवस्थापन अरविंद देवतळे यांनी केले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आनंदराव कडुकार,टिकारामजी वाघमारे,वामन बोरकर, संजय ठाकरे, नितेश वाकडे, हरिश्चंद्र धोंगडे,दिलीप नन्नावरे,पियुष देवगडे,दिलीप नन्नावरे,दयावंत जांभुळे कमल गुडधे, सुमित्राबाई चौखे,भारत जांभुळे,बारेकर,वाढई,चौधरी, यांनी परिश्रम घेतले.









