ताज्या घडामोडी

“तुमसे ना हो पायेगा” – मराठवाडा स्तरीय आंदोलन; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा एल्गार

“तुमसे ना हो पायेगा” – मराठवाडा स्तरीय आंदोलन; उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेचा एल्गार

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने “तुमसे ना हो पायेगा” या मराठवाडा स्तरीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे आंदोलन रविवार दि. १३ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे होणार आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. आ. अंबादास दादा दानवे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या आंदोलनास आ. डॉ. राहुल पाटील, लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे, माजी आ. मीराताई रेंगे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या आंदोलनानंतर त्याच दिवशी दुपारी ३:०० वाजता आर. पी. हॉस्पिटल, पाथरी रोड, परभणी येथे परभणी लोकसभा मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक लोकसभा संपर्कप्रमुख प्रदीपकुमार खोपडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या बैठकीस परतूर, घनसावंगी, जिंतूर, पाथरी, गंगाखेड व परभणी या सहा विधानसभा मतदार संघातील सहसंपर्कप्रमुख, विधानसभा प्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, तालुका संघटक, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, सर्कलप्रमुख, उपसर्कलप्रमुख, युवासेना उपजिल्हाधिकारी, तालुकाधिकारी, शहराधिकारी, महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, महेश नळगे (जालना), महानगरप्रमुख डॉ. विवेक नावंदर, महिला आघाडी जिल्हा संघटक सौ. आंबिका डहाळे यांनी केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close