खंडाळा व पेठभानसुली गावातील शाळकरी विद्यार्थीनींची बस वेळेवर येत नसल्याने शालेय विद्यार्थीनींचे हाल
आगार व्यवस्थापक अधिकारी रा.प.चिमुर डेपो यांना पेठभानसुली सरपंच तुळसा श्रीरामे यांचे निवेदन
मुख्य संपादक:कु.समिधा भैसारे
तालुक्यातील शेवटचा टोकावर असलेल मौजा खंडाळा व पेठभानसुली गावातील पाच ते दहावी वर्गातील विद्यार्थी शिक्षण घेण्याकरीता ग्रामदर्शन विद्यालय खडसंगी येते शिक्षण घेण्याकरीता येत असतात त्याना शाळेत येणे -जाणे करण्याकरीता चिमुर आगारातुन बसची व्यवस्था केलेली आहे परंतु संध्याकाळी ५. वाजता शाळेची सुट्टी झाल्यानंतर विद्यार्थीनींना गावी जाण्याकरीता वेळेवर पाच ते साडेपाच दरम्यान चिमुर डेपो मधुन खंडसंगीच्या बसस्थानकावर बस येत नाही. कधी – कधी ती बस रात्री साडेसात ते आठ वाजता येते त्यामुळे विद्यार्थीनींना रात्रो पर्यंत बसस्टापवर बसची वाट पाहत थांबावे लागते ते मुलींचा सुरक्षेचा दुरूस्टीन योग्य नाही मुलींचा सुरक्षेचा दृष्टीने गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी.
त्यामुळे खंडाळा व पेठभानसुली येण्या-जाण्याकरीता संध्याकाळी पाच ते साडेपाच वाजता दरम्यान नियमित वेळेवर बस येईल या दृष्टीने आपल्या आगारातुन बस सोडण्याची व्यवस्था करावी अशी मागणी पेठभानसुली सरपंच
सौ तुळसा देविदास श्रीरामे यांनी चिमुर डेपो आगार व्यवस्थापक बसस्थानक यांना निवेदनातून केली आहे यावेळेस सामाजिक कार्यकर्ते आकाश श्रीरामे उपस्थित होते.