विठ्ठलवाडा येथे संविधान दिन उत्साहात साजरा

समस्त गावकरी विठ्ठलवाडा यांचे आयोजन
ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा
गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे संविधान दीन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली.

प्रमुख वक्ते म्हणून माननीय दिलीप सोळंकी सर यांनी मार्गदर्शन करताना जगाच्या इतिहासात स्वातंत्र,समता, बंधुत्वाचा आदेश देणारा असा एकच संविधान आहे आणि तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून मिळाला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मान.जीवन राजगुरू साहेब ठाणेदार गोंडपिपरी,कार्यक्रमाचे अध्यक्ष मान.के. डी.मेश्राम साहेब तहसीलदार गोंडपिपरी,प्रमुख मार्गदर्शक मान.दिलीप सोळंकी सर उपस्थित होते.संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने संविधान उद्दिशिकेचे वाचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुलभाऊ जम्पलवार यांनी केले,तसेच कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.