ताज्या घडामोडी

संयुक्त लोकशाही आघाडी च्या वतीने आंबेडकरी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची बैठक

प्रतिनिधी: नरेंद्र मेश्राम लाखनी

भंडारा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संबंधाने संयुक्त लोकशाही आघाडी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रणित सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांची अति महत्त्वाची बैठक भंडारा येथे कॅनरा बँकेच्या बाजूला दिनांक 4/12/2021 रोजी दुपारी 1.00 वाजता आयोजित केली आहे

जिल्ह्यातील सर्व 52 जिल्हा परिषद व 104 पंचायत समितीमध्ये उमेदवार समाज एकीकरणाचे माध्यमातून निवडणुकीत उभे करण्याच्या दृष्टिकोनातून या बैठकीचे आयोजन व इच्छुक उमेदवारांनी या बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन संयुक्त लोकशाही आघाडी व सर्व आंबेडकरी राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. सदर बैठकीत आतापर्यंत 16 आंबेडकरी राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने पाठिंबा देण्यात आले आहे व त्यांच्या माध्यमातून उमेदवार निवडणुकीत उभे करण्याच्या दृष्टीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
समविचारी आंबेडकरी संघटनांच्या पदाधिाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सदर बैठकीला उपस्थित राहण्याचे आव्हान अचल मेश्राम, शशीकांत भोयर, श्रीराम बोरकर यांनी केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close