महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडिया चिमूर तालुका अध्यक्ष पदी पत्रकार सुनिल हिंगणकर यांची नियुक्ती

प्रतिनिधी:हेमंत बोरकर
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ डिजिटल मिडीयाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अँड.राहुल थोरात यांनी डिजिटल मिडीयाच्या चिमूर तालुका अध्यक्षपदी पत्रकार सुनिल हिंगणकर यांची नियुक्ती केली. जागतिकनकाशे एक्सप्लोर

चंद्रपूर जिल्हातंर्गत मुल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृह येथे आज झालेल्या सभेचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ निवड समितीचे प्रदेश अध्यक्ष प्रा.महेश पाणसे होते.
तर या सभेला पत्रकार संघाचे जेष्ट पदाधिकारी प्रदीप रामटेके,चंद्रपूर जिल्हाध्यक्ष शंकर बोरसरे,डिजिटल मिडीयाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अँड.राहुल थोरात,चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस केवलसिंग जूनी,चिमूर तालुका संघटक विलास मोहिनकर,आणि चंद्रपूर जिल्हातंर्गत पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

याच सभेत डिजिटल मिडियाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अँड.राहुल थोरात यांनी डिजिटल मिडीयाच्या चिमूर तालुका अध्यक्ष पदी सुनिल हिंगणकर यांची नियुक्ती केली.याचबरोबर बऱ्याच तालुका अध्यक्षांची अँड.राहुल थोरात यांनी नियुक्ती केली.
सर्व नवनियुक्त तालुकाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी भरभरून शुभेच्छा दिल्यात. सुनिल हिंगणकर हे निर्भिड,निष्पक्ष,पत्रकार असून,ते डिजिटल मिडीयाच्या चिमूर तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळतील अशा आशावाद वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.









