ताज्या घडामोडी

मित्रसेवा ग्रुप वरोरा तर्फे दही हंडी उत्साहात साजरी

मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांची विशेष उपस्थिती

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

वरोरा येथे मित्रसेवा ग्रुप तर्फे दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.मागील दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध होते पण या वर्षी कोणतेही निर्बंध नसल्याने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वरोरा शहरातील मध्य भागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे असलेल्या मैदानात दही हंडीचे आयोजन करण्यात आले .वरोरा शहरातील एकमेव दहीहंडी असल्याने संपूर्ण वरोरा शहरातील नागरिकांनी दहीहंडीचा उत्सव बघण्यासाठी एकच गर्दी केली होती. वरोरा शहरातील तरुणाई डॉल्बी च्या तालावर मोठ्या उत्साहात थिरकताना दिसली. मित्रसेवा ग्रुप तर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजुभाऊ उंबरकर (राज्य उपाध्यक्ष मनसे ),उदघाटक सचिन भोयर(जिल्हा उपाध्यक्ष मनसे ) ,राजेंद्रजी वरघणे(जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस) ,फाल्गुन गोहोकार तालुकाध्यक्ष मनसे वणी , शिवराज पेचे शहराध्यक्ष मनसे वणी, यांना प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर उपस्थित होते.
दही हंडी फोडण्यासाठी मित्रसेवा ग्रुप च्या पथकांनी पहिल्या प्रयत्नात चार थर चढवत मान्यवरांना सलामी दिली .सलामी देताना खालच्या थरावरील गोविंदा खाली कोसळल्याने वरच्या थरावर असलेला गोविंदा हंडीला लटकून होता.त्याला अलगद झेलल्याने कोणतीही इजा झाली नाही .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मित्रसेवा ग्रुप चे मार्गदर्शक वैभव डहाने तालुकाध्यक्ष मनसे वरोरा यांच्या मार्गदर्शनाखाली शरद पुरी,राहुल खारकर,अनिकेत श्रीरंग,अभिजित अष्टकार,रोहित मोलगिरी,प्रीतम ठाकरे,निखिल अंबाडरे,सुरज गेडाम,संस्कार कोरेकर,ओम खिरटकर,रोहित खिरटकर,आदर्श लोडे,जयराम नैताम,रुपेश कायरकर,आकाश रंदळे,सृजन मांढरे,शाहरुख पठाण,धीरज गायकवाड,कुंदन मेश्राम,मयूर तितरे,विराज काटकर,पंकज वासाडे,अनिकेत पुरी,सोमीन पाटील,अनिकेत जुनघरे,रितीक चिंचोलकर,कपिल बांदूरकर,हर्षद ढोले,गणेश मांडवकर,,पवन बेलेकर,आकाश ढोके,गणेश बदखल,विनीत आमटे,मुज्जमिल शेख यांनी विशेष मेहनत घेतली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close