पाथरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने
अजिंक्य घड्याळ”महिला संवाद व महिला रॅलीचे आयोजन
माझी लाडकी बहीण योजना घरोघरी पोहचविणाऱ्या अंगणवाडीताईचा सत्कार संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दिनांक 28/09/2024 रोजी शिवाजीनगर पाथरी जि. परभणी येथे “अजिंक्य घड्याळ महिला संवाद” तसेच प्रदेशाध्यक्षा, रूपालीताई चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते या उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्षा गिताताई कुटे,शहराध्यक्षा रेणुका सावळे, मंगलताई आमले, राजकन्याताई तायानक, अर्चनाताई मिरजे आदी उपस्थित होत्या यांच्या वतीने शिवाजीनगर पाथरी येथे “अजिंक्य घड्याळ,महिला संवाद कार्यक्रम व माझी लाडकी बहीण योजना घराघरापर्यंत पोहचविनाऱ्या अंगणवाडीताई यांच्या सन्मानार्थ आदर्श महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन तसेच मा.अजितदादा पवार यांनी सर्व सामान्य जनतेसाठी मंजूर केलेल्या अनेक योजनाची जनजागृती करण्यासाठी महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले” या उपक्रमाद्वारे पक्षाची ध्येय धोरणे, महायुतीच्या माध्यमातून राबवले जाणाऱ्या महिलांसाठी योजना,या विषयावर चर्चा करण्यात आली, त्याचप्रमाणे लाडकी बहीण योजना घरोघरी पोहचविण्याचे काम करणाऱ्या आपल्या अंगणवाडीताईच्या कार्याची दखल घेत “परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने” सुलोचना चव्हाण, सुनीता धनले, शिला नखाते, सुंदर मगर, अशा गाडे, वदंना डुकरे, पुष्पा धुमाळ, उषा गिराम, शिला मनेरे, वदंना गायकवाड व सीमा रंदवे आदी अंगणवाडी ताईंचा मान्यवरच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
मा. अजितदादा पवार यांच्या प्रयत्नाने विशेष करून महिला साठी विशेष लाभाच्या योजना सुरु झाल्या आहेत त्यामुळे आम्ही दादाच्या पाठीशी उभे आहोत या आशयाचे महिलांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता पतंगे यांनी तर आभार प्रदर्शन सुनीता राखूडे यांनी केले.