कलाकुंज महिला प्रशिक्षण संस्था यवतमाळ संस्थे कडून 45 गरजू महिलांना शिलाई मशीन वितरण
प्रतिनिधीःराहुल गहुकर
प.पू. गीताचार्य तुकाराम दादांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून कलाकुंज महिला प्रशिक्षण संस्था यवतमाळ या संस्थेने प्रशिक्षित, अप्रशिक्षित, बेरोजगार, विधवा, व निराधार प्रशिक्षित महिलांना 2500/- व अप्रशिक्षित महिलांना 3000/- अशा सवलतीच्या दराने 45 शिलाई मशीन चे वितरण संस्थेच्या संचालक दुर्गाताई पटले यांनी केले.
एकूण 90 शिलाई मशीन व पाच ब्युटी पार्लर खुर्ची मंजुर झाल्या असून वरोरा, चिमूर, सिंदेवाही, बल्लारपूर अशा अनेक ठिकाणाहून महिलांनी मोठ्याप्रमाणावर मशीनची मागणी केली असल्याने प्रथम टप्यात 45 शिलाई मशीन वितरीत करण्यात आल्या उर्वरित शिलाई मशीन व ब्युटी पार्लर खुर्च्या लवकरच दुसऱ्या टप्यात वितरीत करण्यात येत असल्याचे दुर्गाताई पटले यांनी सांगितले. यावेळी अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवामंडळ गुरुकुंज आश्रम मोझरी येथील डॉ. राजाभाऊ बोथे, भाऊसाहेब बऱ्हाटे जिल्हा कृषी अधिकारी, अड्याळ टेकडीचे अध्यक्ष मोरेश्वर उईके, सामाजिक कार्यकर्ते दयारामजी कन्नाके, रमेश मेश्राम, सारंग दाभेकर, प्रफूल चंदेल उपस्थित होते.संचालन वर्षा इगोले यांनी केले आभार कांचन ताई कवाळे यांनी केले.