आलेसुर ते डोंगरला रस्त्याची दयनीय अवस्था लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

प्रतिनिधी:प्रा.विश्वनाथ मस्के
भिसी वरून 10 किमी. अंतरावर असलेल्या मौजा आलेसुर ते डोंगरला रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झालेली आहे. जीवावर उदार होऊन जीवघेणा प्रवास जनतेला करावा लागत आहे. आलेसुर हे गावं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या नावाने गुरुदेव नगरी म्हणून ओळखली जाते . दरवर्षी पंच क्रोशी तील गुरुदेव भक्त या गावात पुण्यतिथी मोहत्सवासाठी येत असतात. तसेच विद्यार्थी व नागरीक सुद्धा त्याच रस्त्याने ये जा करतात सर्व गावकऱ्यांना रत्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

मूख्य बाजारपेठ भिसी कडे प्रवास करतांना तारेवरची कसरत करावी लागते. लोकप्रतिनिधींनी या गावाकडे व रस्त्याकडे दुर्लक्ष केले आहे. फक्त निवडणुका असल्यावर लोकप्रतिनिधींचे गावात दर्शन होते. बाकी निवडणुका झाल्यानंतर प्रतिनिधी गावाकडे फिरकतही नाहीत. आपणास स्वातंत्र्य मिळून 75 वर्षं झालीत.या सुवर्ण महोत्सवी काळात अशी रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला साधा सुरक्षित रस्ता उपलब्ध नाही.या पेक्षा मोठी शोकांतिका दुसरी काय असू शकते. त्वरित रस्त्याचे डांबरीकरण न झाल्यास येणाऱ्या ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांवर जाहीर बहिष्कार टाकण्याचा विचार गावकरी करीत आहे.प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आलेसूर या गावासाठी उपलब्ध नाही का? असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे. तरी या गंभीर प्रश्नावर आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्षपने लक्ष केंद्रित करून पक्का रस्ता उपलब्ध करुन देण्यात यावा अशी मागणी गांवकरी करीत आहेत.








