रेणाखळी जि.प शाळेत निरोप समारंभ
मुलांचा अभिनव उपक्रम
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
तालुक्यातील रेणाखळी येथे जि.प .शाळेत इयत्ता आठवीच्या मुलांना व या शाळेतुन बदलीस पात्र शिक्षकांना इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ आयोजित केला होता , आठव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात पहिल्या वर्गात शाळेत प्रवेश केल्यापासून आठवणी सांगितल्या व आमच्या शिक्षकांनी आमच्यावर केलेल्या संस्कार व दिलेल्या ज्ञानाबददल आभार मानले. तसेच शाळेतील शिक्षक बि.जी.गव्हाणे, व्हि.टी.गव्हाणे,शेख.सलीम.हुलवणेसर , लोखंडे मॅडम, राऊत सर, या सर्वांची बदली दुसऱ्या शाळेवर झाल्याने व या सर्वांनी रेणाखळी शाळेवर दहा ते बारा वर्षे उत्तम सेवा दिली त्या बद्दल विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकवृंदाचा सत्कार करण्यात आला.
इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने सर्व शिक्षकवृंद व शाळेतील विद्यार्थ्यांना स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एक आठवण म्हणून स्वखर्चाने एक टेबल व खुर्ची भेट म्हणून देण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांना पुढील आयुष्यासाठी मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उध्दव इंगळे सदस्य राहुल ठेंगे मुख्याध्यापक तांबोळी जेष्ठ शिक्षक एन एल पवार व वैद्यकीय अधिकारी डॉ सिराज शेख उपस्थित होते.