ताज्या घडामोडी

काजळसर येथे दोन दिवसीय महिला कबड्डी स्पर्धा संपन्न

चिमूर तालुक्यातील मौजा
काजलसर येथे श्री महर्षी वाल्मिकी महिला कब्बड्डी टीमच्या वतीने दोन दिवशीय कब्बड्डी सामन्याचे आयोजन केले होते. यात एकूण 8 महिला चम्मुनी सहभाग घेतला होता.
कब्बड्डी सामन्याची सुरवात दिनांक 16-02-2026 पासून ते 18 -02-2026 पर्यंत सांगता झाली.
सदर कार्यक्रमाचे उदघाटक. मान. बंटीभाऊ भांगडिया आमदार चिमूर विधानसभा यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर अध्यक्ष म्हणून इंदल नागपुरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शामजी हटवादे, मंगेश भाऊ धाडसे सभापती. विलास भाऊ कोराम. महादेव कोकोडे. आशिष ननावरे सरपंच , विश्वास समुसाकडे ,नंदू हटवादे बूथ अद्यक्ष. श्रीकृष्ण सामुसकडे , धनंजय हटवादे संजय नागपुरे, काशिनाथ ठाकरे. दामोदर समुसाकडे इत्यादी पाहुणे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आशिष मेश्राम यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत व भाषणाचे कार्यक्रम होऊन कब्बडीला सुरवात झाली.
त्यामध्ये तीन बक्षीस ठेवले होते. पाहिले बक्षीस 7000 हजार मान. बंटीभाऊ भांगडिया आमदार साहेब यांच्या कडून होते.
दुसरं बक्षीस 5000 हजार मान. मंगेश भाऊ धाडसे यांच्या कडून 3000 हजार आणी श्री महर्षी वाल्मिकी ढीवर समाज काजलसर यांचे कडून 2000 हजार होते.
तिसरा बक्षीस 3000 हजार
मान. संदीप भाऊ पिसे यांच्या कडून 2000 हजार तसेच मान. विलास भाऊ कोराम यांच्या कडून 500 रुपये तसेच मान. महादेव कोकोडे नवतला यांच्या कडून 500रुपये होते.
पाहिले बक्षीस श्री महर्षी वाल्मिकी महिला कब्बड्डी टीम काजलसर यांनी पटकाविले. तरदुसरे बक्षीस एकविरा महिला टीम यांनी पटकाविले.
तिसरा बक्षीस माहुली महिला कब्बड्डी टीम यांनी पटकाविले.
बक्षीस वितरणा साठी नंदू पा. हटवादे बूथ अध्यक्ष यांच्या हस्ते. धनंजय हटवादे. श्रीकृष्ण सामुसाकडे अध्यक्ष. संजय नागपुरे सचिब. काशिनाथ ठाकरे. उपाध्यक्ष बळीराम हटवादे. आणी आभार प्रदर्शन आशिष मेश्राम सरांनी केले. अशा प्रकारे कार्यक्रम दोन दिवशी कार्यक्रम पार पडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close