फुलकळस येथे शिक्षण परिषद संपन्न
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
पूर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रिय आदर्श प्राथमिक शाळा फुलकळस येथे एप्रिल महिन्याची अध्ययन क्षतिपूर्ति कार्यक्रमाची शिक्षण परिषद संपन्न झाली गत दोन वर्षांपासून कोरणामुळे शाळांमध्ये झालेल्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनातील क्षती झाल्याने जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने अध्ययन क्षतिपूर्ति कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फुलकळस केंद्राचे केंद्रप्रमुख सिद्धार्थ मस्के हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मुख्याध्यापक दयानंद स्वामी,
जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे इंग्रजी विषयाचे साधनव्यक्ती प्रसन्न भावसार यांची विशेष उपस्थिती होती. प्रसन्न भावसार यांनी वुई लर्न इंग्लिश आणि ईझी रीडिंग बुक या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.
ईझी रीडिंग बुकच्या माध्यमातून महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यामध्ये सदरील काम चालू असल्याचे प्रसन्ना भावसार यांनी सांगितले. याप्रसंगी फुलकळस येथील पदवीधर शिक्षक महेश लोहकरे व इंग्रजी विषयाचे शिक्षक प्रशांत टाक यांच्या पुढाकाराने इझी रिडींग बुक या पुस्तकाचे विमोचन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
शिक्षण परिषदेत अध्ययन क्षतिपूर्ति कार्यक्रमासाठी सुलभक म्हणून राम महाजन, सुनील शेळके, नितीन चौकेवार व तुकाराम काशीकर यांनी केंद्रांतर्गत सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खडाळा येथील पदवीधर कैलास सुरवसे यांनी केले तर आभार प्रशांत टाक यांनी मानले.