ताज्या घडामोडी

पंचनाम्यात वेळ न घालता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून आर्थिक मदत द्यावी

किसान युवा क्रांती संघटनेची मागणी

प्रतिनिधी:बालाजी कऱ्हाळे वसमत

मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे,तेंव्हा शासनाने पंचनाम्यात वेळ न घालवता सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ अर्थिक नुकसान भरपाई द्यावी. तसेच शासनाने काढलेल्या ई-पिक पाणी पेरा आॅनलाईन करण्यासाठी अँप काढले आहे पण हा आँनलाईन पिक पेरा करणे शेतकऱ्यांसाठी डोके दुखी ठरली आहे.कारण अनेक ग्रामीण भागात नेटवर्क प्राँब्लेम येत असल्याने पिक पेरा करण्यासाठी शेतकऱ्यांना आडचणी येत आहेत त्यातच प्रशासनाने दिलेली अंतिम तारीख हि ३० सप्टेंबर असुन आज प्रयत्न ५०% सुध्दा पेरा नोंद झालेला नाही तेव्हा आँनलाईन सोबतच आँफलाईन पेरा प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना करण्यासठी शासनाने आदेश द्यावेत या मागणी साठी आज वसमत तहसील कार्यालय यांना किसान युवा क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले या वेळी संघटनेचे अध्यक्ष बालाजी पाटील क-हाळे,वैभव जाधव वैचारिक लेखक,वैभव बेंडे तालुका सोशल मीडिया प्रमुख, शेख तोफीक तालुका सचिव,शंकर यादव गिरगांव गट प्रमुख व इतर पदअधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close