नेरीतिल नवीन रस्ता देतोय अपघातांना आमंत्रण!

रस्त्याचे अपूर्ण काम पूर्ण करण्याची जबाबदारी कुणाची?
रस्ता बांधकाम करताना एमआरजीएस नियमांची पायमल्ली
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
चिमूर तालुक्यात नेरी हे गाव लोकसंख्येने मोठे असून या गावांमध्ये प्रत्येकाजवळ काही ना काही वाहन आहेत. शंकरजी मंदिर ते पेठ विभाग यांना जोडणारा रस्ता हा गावचा दर्शनी असल्यामुळे तसेच या रस्त्याने दोन-तीन खेडेगाव जोडलेले असल्यामुळे गावात जाण्यासाठी या रस्त्याने नेहमीच जास्त वर्दळ असते. या रस्त्याचे काम याच वर्षी मार्च एप्रिलमध्ये एम आर जी एस मधून करण्यात आले. तेही काम पूर्ण झालेले नाही. रस्त्याचे काही काम करताना ठेकेदाराने एमआरजीएस नियमांना डावलुन या कामावर गावातील मजुरांना काम न देता त्यांनी बाहेरगावचे मजूर कामाला लावून आपले मर्जीनुसार काम केले. रस्त्याच्या दोन्ही बाजूस मुरूम भरणा न करता फक्त सिमेंट रोड तयार करून रस्ता लोकांना जाण्या येण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. परंतु या रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे दोन वाहने एकाच वेळेस कटत नसल्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही, या ठिकाणी बऱ्याच वेळेस काही वाहनधारक सुद्धा पडलेले आहे.
या रस्त्यावर एमआरजीएस मधून झालेले काम ते पण समाधानकारक झालेले नाही तसेच रोड तयार झाल्यानंतर रोडवर पाणी बरोबर सुद्धा मारलेले नाही त्यामुळे रस्त्यांचे जीवनमान किती वर्ष टिकेल असे निश्चित सांगता येत नाही किंवा रस्ता पक्का झाला याची शाश्वती राहिलेली नाही. त्यातही या दोन महिन्यातच रस्त्याला भेगा जाणे चालू झालेले आहे. त्यामुळे हे झालेले काम निकृष्ट दर्जाचे आहे की नाही यासाठी रोडची योग्य चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जनतेने मागणी केलेली आहे.