ताज्या घडामोडी

आ.गुट्टे यांनी घेतली राज्यपालांची भेट

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची केली मागणी.

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक ६ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल मा.भगतसिंग कोश्यारी हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी त्यांची भेट घेऊन राज्यभरात अतिवृष्टी व मिलीपेड, गोगलगाय इत्यादी नैसर्गिक आपत्तीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. त्याच बरोबर महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत अराजपत्रित गट-ब संवर्गातील पदांच्या जाहिरातीमधील धनगर समाजाच्या (NT-C) प्रवर्गाच्या जागेच्या संदर्भातही राज्यपाल महोदयांना निवेदन दिले.
यावर्षी राज्यभरात पावसाने अत्यंत धुमाकूळ घातला आहे. शेतात पाणी साचल्याने खरीप २०२१ हंगामातील सोयाबीन, कापूस, ज्वारी, मूग इत्यादी पिकांची नासाडी झाली असून पूर परिस्थितीमुळे नदी व ओढ्याकाठच्या शेतकऱ्यांचे ही अतोनात नुकसान झाले आहे. उगवण झालेल्या पिकांची पाने मिलीपेड, गोगलगाय इत्यादींनी कुरतडल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. कोरोना महामारी मुळे परेशान असलेला जगाचा पोशिंदा या नैसर्गिक आपत्तीने अधिकच खचला असून त्याला वेळीच सावणे गरजेचे असल्याने शासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी या वेळी केली. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सेवेतील राजपत्रित गट ब संवर्गातील भरतीकरीता दि.२८ फेब्रुवारी २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली जाहिरात दि. १४ जुलै २०२१ ह्या दिवशी सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. सदरील जाहिरातीमध्ये धनगर समाजासाठी (एनटीसी प्रवर्ग) शासकीय आरक्षणानुसार ३.५ टक्के याप्रमाणे जागा मिळाव्यात, परंतु सदरील जाहिरातींमध्ये धनगर समाजासाठी प्रवर्ग पोलीस उपनिरिक्षक ह्या पदासाठी सर्वसाधारण १ जागा आणि महिला करिता १ जागा अशा केवळ २ जागा देण्यात आलेल्या आहेत. तरी शासकीय आरक्षणानुसार पोलीस उपनिरीक्षक ६५० जागांपैकी २२ जागा एनटीसी प्रवर्गासाठी मिळाव्यात. ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपत आलेली आहे अशा उमेदवारांचा विचार करून सदरील जाहिरातींमध्ये एनटीसी प्रवर्गासाठी अधिकर्ष पदे निर्माण करून जागा वाढवून देण्याची विनंती आमदार गुट्टे यांनी राज्यपाल महोदयांकडे केली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले, राजेश फड, रवी कांबळे आदी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close