ताज्या घडामोडी

चला सौर मंडल पाहुया

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

जिल्हा परिषद परभणी व परभणी अँस्ट्रॉनॉमीकल सोसायटी परभणी यांच्या सयुक्त विद्यमानाने जि.प. आंतरराष्ट्रीय प्राथ व माध्य शाळा बोरगव्हाण येथे दि 13 नोव्हे 2022 वार रविवार रोजी सायं 5:30 वाजता अतिशय सुंदर असा सौर मंडल निरीक्षण व त्याच विषयाशी संबंधित इतर विषयी माहिती व प्रात्यक्षिक कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी मा. रश्मी खांडेकर मॅडम मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.परभणी,डॉ.रामेश्वर नाईक सर, मा.दादासाहेब टेंगसे माजी शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.परभणी,मा.विठ्ठल भुसारे सर शिक्षणाधिकारी ( प्राथमिक),भाऊसाहेब खरात गटविकास अधिकारी प.स.पाथरी,मुकेश राठोड सर
ग.शि.अ.पाथरी व
मुख्याध्यापक, शिक्षक , शा.व्य.स.व सर्व विद्यार्थी,पालक व गावकरी नागरिक उपस्थित होते.यावेळी सर्व तज्ञांनी मार्गदर्शन केले यामध्ये
परभणी विज्ञान चळवळ मार्गदर्शक दिपक शिंदे सर
ताऱ्यांचे विश्व मार्गदर्शक डॉ. विजयकुमार नरवाडे सर
दुर्बीणी मार्गदर्शक प्रसाद वाघमारे सर
आकाश दर्शन मार्गदर्शक डॉ रामेश्वर नाईक सर

आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा बोरगव्हान नक्कीच जिल्ह्याला आदर्श अशी शाळा आहे.गावाने व लोकप्रतिनिधी यांनी ठरवले तर काय होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे हे समोर असलेले सभागृह लोकसहभाग चळवळ वाढली पाहिजे याने गाव खेड्यांचा विकास होतो महिला शिकली तर क्रांती घडवून आणू शकते त्यामुळे मुलींना शिकवा बालविवाह होता कामा नये.

  • मा.रश्मी खांडेकर मॅडम मुख्यकार्यकारी अधिकारी परभणी

गुणवत्तापूर्ण शिक्षण हे फक्त जिल्हा परिषद शाळेतच मिळते.लोकसहभाग काय असतो हे आमच्या सभापती कार्यकाळात आम्ही भुसारे सर,गिलडा सर,डोंगरे सर व इतर सर्व शिक्षक टीम नी पालक मेळावे घेऊन 4 कोटी रु लोकसहभाग जमा करून शाळा ई-लर्निंग केल्या जेणेकरून वाडी वस्ती तांड्यावरील मुलाला उत्तम शिक्षण मिळाले पाहिजे तो स्पर्धेत टिकला पाहिजे तो भविष्यात कलेक्टर ,डॉ.इंजिनिअर किंवा शास्त्रज्ञ झाला पाहिजे.

मा.दादासाहेब टेंगसे
माजी शिक्षण व आरोग्य सभापती जि.प.परभणी

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close