ताज्या घडामोडी

लसीकरण केंद्रावर उपस्थितांना प्राधान्य द्या अन्यथा केंद्रावर धिंगाणा घालू:मनसे वरोरा चे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

एकीकडे सरकार लस घेण्याचे आवाहन करत आहे तर दुसरीकडे वि आय पी लोकांना प्राधान्य देत सर्वसामान्य गावकऱ्यांना रांगेत उभे राहुन देखील लस मिळत नाही अशी अवस्था बोर्डा येथील लसीकरण केंद्रावर झाली आहे.लस घेण्याकरिता लसीकरण केंद्रावर सकाळी 8.30 वाजता पासून उभे राहून सुद्धा नोंद वहीत आधीच 20 ते 25 लोकांची नावे ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांकडून घरूनच नोंद करून आणल्या जाते त्यामुळे उपस्थित लोकांना लस मिळत नाही .दिनांक 17 जुलै रोजी बोर्डा येथील प्राथमिक शाळेत असणाऱ्या लसीकरण केंद्रावर लस घेणाऱ्यांची नोंदणी करण्यासाठी असलेल्या नोंद वहीत आधीच 20 ते 25 नागरिकांचे नाव लिहून असल्याचे निदर्शनास आले त्यांनंतर लसीकरण केंद्रावर प्रशांत बदकी ,तालुका सचिव मनसे यांनी विरोध केला त्यामुळे काही काळ लसीकरण केंद्रावर वातावरण संतप्त झाले होते .ही बाब त्यांनी उपस्थित ग्राम पंचायत सदस्य व सरपंच मॅडम ना निदर्शनास आणून दिली .प्रत्येक केंद्रावर 100 नागरिकांचेच लसीकरण होत असल्याने इतर 75 लोकांनाच लस मिळत आहे. तर रांगेत असणाऱ्या लस न घेता आल्यापाऊली परत जाण्याची वेळ येत आहे.पुन्हा जर अश्याच घटना घडणार असेल तर मनसे लसीकरण केंद्रावर धिंगाणा घालेल असा इशारा आज गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा ला निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.निवेदन देतेवेळी कुणाल गौरकार, सचिन मांडवकर, विकी येरणे,कल्पक ढोरे, पंकज दडमल व तालुका सचिव प्रशांत बदकी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close