गडचिरोली येथे सिकलसेल शिबिर संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
चंद्रपुर जिल्हा सिकलसेल सेवाभावी संस्था, वरोरा, गेल्या अनेक वर्षा पासून निःस्वार्थ पणे सिकलसेल पीडितांसाठी काम करीत आहे. सिकलसेल हा आजार असह्य वेदना देणारा, बरा न होणारा आहे. परंतु या आजाराला हिमोटोलाजिस्ट डॉक्टरची योग्य ट्रीटमेंट ची साथ मिळाली तर आजार नियंत्रित राहू शकतो आणि पेशंट वेदनारहित आनंदी, समाधानी, लांब आयुष्य जगू शकतो.
सिकलसेल आजार हा महाराष्ट्रात विदर्भात मध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात मोठया प्रमाणात दिसून येतो.परंतु महाराष्ट्रामध्ये शासकीय रुग्णालयात कुठेच हिमोटोलाजिस्ट डॉक्टर ची नियुक्ती नाही. त्यामुळे सिकलसेल पेशंटला अत्यंत वेदनेत, मरणयातना जीवन जगावे लागते. सिकलसेल पेशंटच्या वेदना लक्षात घेता आमची संस्था, पेशंटला ला हिमेटोलाजिस्ट डॉक्टरचे मार्गदर्शन, ट्रीटमेंट, औषधोपचार योग्य मिळावे यासाठी पाऊल उचलले आहे.
चंद्रपूर जिल्हा सिकलसेल सेवाभावी संस्था, वरोरा आणि नागपूरचे प्रसिद्ध तज्ञ मानानिय. डॉ. शैलेश बांबोर्डे, हिमेटोलॉजिस्ट, (केईम मुबंई) ऑन्कोलॉजिस्ट आणि बोन मॅरो ट्रांसप्लांट तज्ञ नागपुर यांच्या सहकार्याने मा. डॉ. रमेश कटरे सर यांनी दि. 24/2/2026 ला आरोग्यधाम संस्था कुरखेडा ,गडचिरोली तर्फे प्रथमच सिकलसेल मार्गदर्शन, तपासणी आणि उपचार शिबिराचे आयोजन केले. या शिबिराला आमच्या संस्थेचे पदाधिकारी,अध्यक्ष सुनील सातपुते, सहसचिव विनोद ढोके, उमेश देशमुख , मोहन खापणे, यांनी पेशंटच्या काही अडचणी होत्या त्यावर चर्चा करून मार्गदर्शन केले. शिबिर यशस्वीरित्या पार पडले . या नंतरही इतर जिल्हा मध्ये सिकलसेल तपासणी उपचार शिबीर घेण्याचे संस्थेचे मानस आहे. यासाठी शासनाने सुद्धा संस्थेला मदत, सहकार्य करावे.









