ताज्या घडामोडी

ब्रम्हपूरी तालूक्यात अवैध रेतीची तीन वाहने पकडली

चंद्रपूर जिल्हा खनिकर्म विभागाची कारवाई

प्रतिनिधीःरामचंद्र कामडी

चंद्रपूर जिल्ह्यात मध्यरात्री नदी घाटावरुन अवैध रेती नेण्याचे प्रकार दिवसांगणिक वाढले असून यावर अंकुश लावण्यासाठी तथा दंडात्मक कारवाई करण्यासाठी जिल्ह्यातील महसूल विभागातील काही प्रामाणिक अधिकारी व कर्मचारी आजही प्रामाणिकपणे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.वाहनाने अवैध रेती चोरुन नेणां-या वाहनांकडे जिल्हा खनिकर्म विभाग सातत्याने लक्ष पूरवित आहे.दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात या पथकाने नुकताच एक दौरा करून गुप्त माहितीच्या आधारे तीन अवैध रेती वाहनांना ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे.सदरहु कारवाई चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा , अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे व जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम यांच्या मार्गदर्शनाखाली खनिज निरीक्षक दिलीप मोडके , भौ.मा.प्र.खेलचंद वनकर व वाहन चालक मनोज जिवतोडे यांनी केली आहे.ठिकठिकाणी केलेल्या कारवायां मुळे ब्रम्हपुरी तालुक्यातील रेती तस्करांत एकच खळबळ उडाली आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close