श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार येथे सात्विक धुलिवंदन महोत्सव संपन्न

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
श्री गुरुदेव सेवा मंडळ सरडपार येथे चिमुर तालुका राष्ट्रसंत तत्वज्ञान प्रचार व प्रसार समितीचे वतीने सात्विक धुलिवंदन महोत्सव आयोजित करण्यात आला.याकरिता तालुक्यातील बरीच प्रचारक मंडळी उपस्थित झाली.त्या निमित्ताने सामुदायिक ध्यान चिंतन गजानन ठाकरे दादा यांनी व्यक्त केले.सकाळी ७.३० वा गावामधुन रामधुन काढण्यात आली व याप्रसंगी ग्रामगीताचार्य डॉ राम गभने यांनी चिंतन व्यक्त केले त्याचप्रमाणे चिंतन बैठकीत प्रा.महादेवराव पिसे सरांनी राष्ट्रसंतांच्या विचार चिंतन व्यक्त केले व प्रचार व प्रसार या विषयी चिंतन झाले.सुत्रसंचान गजानन ठाकरे यांनी केले तर प्रस्ताविक अरविंद देवतळे यांनी केले आभार आनंदराव कडुकार यांनी मानले.यामध्ये टिकारामजी वाघमारे,संजय ठाकरे, दयावंत जांभुळे,पियुष देवगडे,दिलीप नन्नावरे, प्रकाश गोहणे,वामन बोरकर, हरिश्चंद्र धोंगडे, नितेश वाकडे, रामचंद्र कामडी व बहुसंख्य प्रचारक उपस्थित होते.राष्ट्रवंदना व जयघोषाने सांगता झाली.








