ताज्या घडामोडी

माळी समाजाचा आवाज हरपला

लोकनेते सचिन गुलदगड यांना कोपरगाव मध्ये श्रध्दांजली

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

राहुरी येथील रहिवासी राज्यातील माळी समाजाचे भुषण, लोकनेते श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिनभाऊ भाऊसाहेब गुलदगड यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. माळी समाजाचा आवाज सचिन गुलदगड यांना कोपरगाव येथील माळी बोर्डिंग येथे माळी समाज बांधवांनी उपस्थित राहुन शोक व्यक्त करून श्रध्दांजली अर्पण केली.

अॅड रविंद बोरावके यावेळी बोलताना म्हणाले की, सचिन गुलदगड यांच्या अपघाती निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. मी व माझे परिवार तसेच ज्योती पतसंस्थेच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

तळागाळातील विषयांची सविस्तर माहिती त्यांना असायची आणि त्यातून एखाद्या गोष्टीसाठी पाठपुरावा कसा करायचा हे त्यांना ठावूक असायचे. त्यामुळेच राज्याच्या सामाजिक व समाजकारणात ,राजकारणात त्यांनी आपले वेगळे अस्तित्व सिद्ध केले. माळी समाजाला नेतृत्व देणारे व्यक्तिमत्व आज हरपले आहे.

मुकुंदमामा काळे यावेळी श्रध्दांजली अर्पण करताना म्हणाले की, सचिन गुलदगड यांचे निधनाची बातमी मनाला चटका लावणारे आहे. मला खूप दुःख होत आहे. माझे ते अत्यंत जवळचे मित्र होते. सचिन गुलदगड यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. ती भरून काढणे खरंच अवघड आहे. माळी समाजाची मोठी हानी झाली आहे. माळी समाजाच्या न्याय व हक्कासाठी सातत्याने संघर्ष केला.एक संघर्ष करणारा चळवळीतील नेता कायमचा पडद्याआड गेला आहे.

प्रदीप नवले बोलताना म्हणाले की, समाजाच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या विघ्नहर्त्यासारखे धावून येणारा मसीहा काळाने हिरावून नेला, मनाला वेदनादायी हुरहूर लावून जाणारी ही घटना आहे. सचिन गुलदगड यांनी गेली अनेक वर्षे महाराष्ट्रात माळी समाजासाठी अत्यंत मोलाची कामगीरी केली. सामाजिक प्रश्नासाठी त्यांच्या काही भूमिका होत्या त्याची त्यांनी मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने केली आहे. प्रश्नांची मांडणी करत असताना त्यांनी कधी कटुता आणू दिली नाही.

यावेळी अॅड.रविकाका बोरावके, प्रदीप नवले, निवृत्ती बनकर, मुकुंद काळे, संगीता मालकर,विलास जगझाप, रामराव जगझाप, कैलास जगझाप, बापुसाहेब इनामके, सतिष भुजबळ, चंद्रशेखर भोगंळे, रविंद्र चौधरी, संभाजी जाधव, अशोकराव माळवदे, डाॅ.मनोज भुजबळ,योगेश ससाणे, शेखर बोरवके, सचिन ससाणे , मनिष जाधव, अमोल माळवदे,सागर गिरमे, मयुर बोरावके, मोहन निकम,संदीप डोखे, संतोष रांधव, मनोज चोपडे, अनंत वाकचौरे, ओंकार वढणे यांच्यासह आदी माळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close