ताज्या घडामोडी

पालम नगरपंचायत व सार्वजनिक बांधकामाच्या पालम परभणी 235 राष्ट्रीय महामार्गाचा वादाचा होत आहे सर्वसामान्य जनतेला त्रास

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

पालम शहरातून परभणी व हिंगोली जिल्ह्यास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 235 हा काम मंजुर झालेला असुन पालम शहरापर्यंत हा काम पुर्ण झालेला आहे.हा महामार्ग परभणी व हिंगोली शहराला जोडण्यासाठी अत्यंत जवळचा मार्ग ठरलेला आहे.परंतु सदरील महामार्ग पालम शहरातच रखडलेला आहे.सदरील महामार्गाचे काम
एक ते दिड वर्षापासून चालू आहे.सदर महामार्गाचे काम पालम ते फरकंडा चौक पर्यंत झालेले आहे. पालम शहरातील 235 महामार्गावरील सिमेंट काँक्रीटचे काम सदरील गुत्तेदार यांनी दोन ते तीन महिन्यापासून थांबले आहे संबंधित गुत्तेदार याला आमचे प्रतिनिधीने विचारले असता काम का बंद आहे तर गुत्तेदार म्हटला की नगरपंचायत काम आम्हाला करू देत नाही कारण की रोड च्या खालून पाण्याची पाईप लाईन गेली आहे. ती जर फुटली तर त्याची भरपाई गुत्तेदाराने करून द्यावी नाहीतर सार्वजनिक बांधकाम विभागाने करून द्यावी या कारणामुळे हे काम दोन ते तीन महिने झाले बंद आहे याचा त्रास पालम शहरवासीयांना व इतर ये-जा करणाऱ्या प्रवास यांना होत आहे.या महामार्गावर बरीच शासकीय कार्यालय आहेत जसे की पोलिस स्टेशन, ग्रामीण रुग्णालय,जिल्हा परिषद शाळा,उर्दू शाळा,टपाल ऑफिस नगरपंचायत कार्यालय, सद्यस्थितीत या रोडवर पूर्ण खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहेत या रोडवर लोकांना आपला प्रवास हा हातात जीव घेऊन करावा लागतो कारण या रोडवर याच्या अगोदर अनेक अपघात झालेल्या घटना घडलेल्या आहेत तरी या दोन्ही शासकीय कार्यालयाला यांच्याशी काही घेणे देणे नाही आता पावसाळ्याची दिवस चालू झाले आहेत या महामार्गाने ये-जा करणाऱ्या प्रवास यांना यांचा खूप कठीण त्रास झालेला आहे.छोट्या छोट्या मुलांना शाळेला देखील जाणे खूप कठीण झाले आहे
या दोन्ही कार्यालयाने एक दुसऱ्याला सहकार्य करून रोडचे काम मार्गी लावावे व पालम तालुका दंडाधिकारी त्यांनी समन्वय घडवून आणावा व सदर रोडचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश संबंधित गुत्तेदारला देण्यात यावे जर हे काम आठ दिवसात सुरू झाले नाही तर पालम शहरवासी यांच्या याकडून तहसील कार्यालया समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल या आंदोलनात काही अप्रिय घटना घडल्यास याची पूर्ण जबाबदारी शासनाची राहील असे निवेदन पालम शहर वासिया तर्फे पालम तहसील कार्यालयात देण्यात आले या निवेदनावर.शेरखा युसूफ खान पठाण,एडवोकेट फसीयोद्दिन सरवरी,शहानवाज खा मीर आलम खान पठाण,अकबर खा मुनवर खा पठाण,अमानुल्ला खा खैरुल लाखा पठाण,सय्यद अली इस्माईल,पत्रकार अनिस लतिफ खुरेशी,शेख रऊफ शेख लतीफ,रफिकखा बशीरखा पठाण,साबेर लतीफ भाई खुरेशी शेख सादेक, सलमान खान पठाण यांच्या या निवेदनावर‌ इतर लोकांच्या सह्या आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close