हिंदू ,हिंदुत्व आणि हिंदुवाद – कट्टरता, राजकारण आणि धर्मवाद – डॉ जितीन वंजारे

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
हिमालय ते कन्याकमारीपर्यंत आणि सिंधू ते ब्रह्मदेश पर्यंत या परिसरात ज्याही धर्म पंथ संत समुदायातील लोकं जन्मली किँवा त्यांचे पूर्वजानी अधिवास केला त्या सर्वांना हिंदु म्हटले जाते.आणि म्हणून हिंदु हा विशिष्ट धर्म नसून ती जगण्याची संस्कृती आहे जी येथिल प्रत्येक सजीवात आहे म्हणूनच येथील प्रत्येक जीव हिंदु आहे.हिंदू हा मूळ पारसी शब्द असून पारसी भाषेमध्ये स या शब्दाला ह संबोधले जाते. भारताची संस्कृती ही सिंधू नदीच्या खोऱ्यातून उगमास आलेली आहे. फार जुन्या काळामध्ये जेव्हा मानवाच्या उत्क्रांतीचा काळ होता त्यावेळी मानवी संस्कृती नदीच्या काठावरती उदयास येत असे. याचं कारण नदीच्या काठी सुपीक जमीन, मुबलक पाणी आणि खाण्यासाठी उपयुक्त अशा वनस्पतीचे जंगले असत, खाण्यायुक्त फळ झाडी, शिकारीसाठी प्राणी, शिकारीची साधन या सगळ्यांच्या उपलब्धतेमुळे मानवी संस्कृती जगामध्ये नदीच्या काठावरती उदयास आली. अशाच प्रकारे भारताच्या हिमालयामधून अनेक नदीचे उगम झाले यापैकी सिंधू नदी ही मोठी आणि मानवी संस्कृतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नदी मानली जाते या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये जी मानवी संस्कृती उदयास आली त्या संस्कृतीला फारशी भाषेमधे ‘स’ चा अपभ्रंश ‘ह’ झाल्यामुळे त्यांना ‘सिंधू’ वरून ” असे संबोधले गेले.त्यामुळे पुढे सिंधूचा अपभ्रंश हिंदू होऊन येथील राहणाऱ्या सर्व लोकांना हिंदू असे संबोधले गेले. त्यामूळे हिंदु हा धर्म नसून ती प्राकृतिक नैसर्गिक जगण्याची आणि मूलतः उदयास आलेली संस्कृति आहे हे सिद्ध होत.
मग हिंदू हा धर्म आहे काय? हिंदू हा धर्म आहे तर हिंदु धर्माला एक विशिष्ट मालक असला पाहिजे?संस्थापक असला पाहिजे ? धर्माचा विशिष्ट कायदा असला पाहिजे ? धर्माचे विशिष्ट नियम असले पाहिजे? धर्माचा विशिष्ट प्रवक्ता असला पाहिजे? धर्मगुरू असला पाहिजे तर हिंदू हा धर्म नसून ही संस्कृती आहे. आणि ती विविधतेने नटलेली आहे.आणि हे खोटं असेल तर सिद्ध करा.विविध जाती धर्माचा, पंथांचा, वंशाचा गोतावळा या हिंदू संस्कृतीमध्ये आहे त्यामुळे हिंदू ही जात किंवा हिंदू नसून ती प्राकृतिक संस्कृती आहे.हा धर्म अशी धुंदवडे उडवणार्या लोकांना जातीवादी मानसिकतेने ग्रासलेले आहे असे मला वाटते.त्यामुळे हिंदू हिंदुत्व हिंदुवाद कट्टरता हे फक्त राजकारण करणे इतकच मर्यादित असून हिंदू आणि हिंदुत्वाचा व हिंदूवादी मानसिकतेचा जे जे लोक राजकीय स्वार्थासाठी उपयोग करतात त्यांचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो. हल्लीच्या काळामध्ये हिंदू,हिंदुत्व आणि त्यावरून होणारे जातीवादाचे धर्मवादाचे जे प्रसंग घडत आहेत ते लाजनिय आहेत. हिंदुत्ववादी सरकार, हिंदूराष्ट्र, हिंदुत्ववादी मुद्दे यामुळे माणसात माणूस राहत नसून जातीपातीमध्ये तेढ निर्माण होऊन एकदा का मोठा धर्मवाद झाला की माणसाच्या अधोगतीला सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही सार्वभौम भारताला तुकडे करण्यास कारणीभूत असणारी गोष्ट आहे त्यामुळे आजच्या सुज्ञान युवकांनी यावर विचार करून आपण धर्मवाद, जातीवाद या गोष्टींमध्ये न पडता आपला स्वतःचा विकास करावा आणि हिंदुत्व म्हणजे माणसाने माणसाला माणसासारखं वागण्याची शिकवण किँवा शासन आहे हे लक्षात घ्यावे.
ऋग्वेदातील बृहस्पती आगम ह्या भागातील श्लोकात खालीलप्रमाणे उल्लेख आढळतो-
हिमालयं समारभ्य यावद् इन्दुसरोवरं । तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ।। याचा अर्थ असा की , हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेला हा भूभाग व देवतांनी निर्मिलेला हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो. पण हिंदु धर्माचा त्यात उल्लेख नाही.तसेच सावरकर यांनी आसिन्धुसिन्धुपर्यन्ता यस्य भारतभूमिका |पितृभु:पुण्याभूश्चैव स वै हिन्दुरीति स्मृत: || याचाच अर्थ सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. मग तो कुठल्याही जाती, धर्माचा का असेना. मूळात हिंदू हा केवळ एक धर्म नाही, तर ती एक जीवनप्रणाली आहे. ‘हिंदुधर्म’ हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष आणि अनन्य नाव नसून, ज्या अनेक धर्मांची तसेच पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी व पुण्यभूमी आहे, त्या सार्यांना समावेशिणार्या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे, इतकी सोपी व्याख्या सावरकरांनी हिंदुस्थानाची केल्याचे आढळते. हिंदु हा शब्द लेखणीत आणणारे सावरकर यांच्या मते हिंदु या शब्दाची व्याख्या वरीलप्रमणे असुन हिंदु धर्मातील अनिष्ट रूढी परंपरा घाणेरडे रीतीरीवाज त्यांना मान्य नव्हते ते वेळोवेळी बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी त्याकाळी सांगितले होते. भारतातील आणि भारताबाहेर च्या अभ्यासकांनी पण यावर लिखाण केलें आहे. समर्थ रामदास, रविदास, बिपिन चंद्र पाल, बाळ गंगाधर टिळक, लाला लजपत राय, महात्मा गांधी, सावरकर यानी त्याकाळी हिंदूत्व राजकिय दृष्ट्या पुढे नेण्याचं काम केलं आणि आजही त्याचं मुद्यावर राजकारण चालते आहे. आजकाल काही संघटना ‘हिंदू खतरे मे हैं’ म्हणत जातिवाद आणि धर्मवाद भडकवत आहेत, काही पक्ष हिंदुत्ववादी अजेंडा समोर घेऊन हिंदुराष्ट्र निर्मितीच्या गप्पागोष्टी करत आहेत.मागे झालेला बाबरी मज्जिद आणि राम जन्मभूमी राम मंदिर वाद क्रीत्येक दिवस चालला यावर काही पक्षाच्या सत्ता आल्या गेल्या आणि मूळ विकासाची मुद्दे बाजूला राहून धर्मवादाची मुद्दे समोर आल्यामुळे विकास बाजूला राहिला आणि इतर मुद्देच समोर आले.आत्ताची राजकीय परिस्थिती लक्षात घेता आज देशाला धर्मवाद,जातीवाद,मंदिर आणि मज्जित यासारखी मुद्दे महत्त्वाची नसून महागाई,शिक्षण, विद्युत,जलसिंचन, इंधन, टेक्नॉलॉजी,शेती विकास इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीतील तमाम राजकारणांनी यावर विचार करून आपले मौलिक अधिकार कोणते आहेत?आणि त्याची कर्तव्य काय आहेत ? त्यांवरून आपल्या मूलभूत गरजा काय आहेत?यावर विचार करून तेच मुद्दे राजकारणात आणले पाहिजेत केवळ हिंदुत्व आणि धर्मवाद नको.आजकाल या पक्षाचे हिंदुत्व वेगळं त्या पक्षाचे हिंदुत्व वेगळं,मी कसा महान तो कसा लहान हीच मुद्दे लक्षात घेऊन राजकारण केले जाते. नाट्यमय सत्तांतर सारख्या गोष्टी लक्षात घेऊन महाराष्ट्राची झालेली वाताहात पहावत नाही जेही राष्ट्र धर्मवादामध्ये वेडेपणाची सोंग घेऊन जातीवादी फूट पाडण्याची काम करेल त्या पक्षांना संघटनांना किंवा तसं राजकारण होणाऱ्या देशांमध्ये जाळपोळ होऊन देश आगेच्या भस्मात नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.
लेखन माननीय सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर-9922541030