ताज्या घडामोडी

सलून व्यवसाय संघटना साकोली तर्फे उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळे व बिस्कीटे वाटप

प्रतिनिधी : गणेश पगाडे लाखनी

श्री सदगुरु गुरुवर्य, राष्ट्रीय क्रांती विरांगणा, राष्ट्रीय नेते जयंती निमित्त शत शत नमन व सामाजिक क्षेत्रातील समाज सुधारक स्मृतिदिन निमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या सहकार्याने सलून व्यवसाय संघटना साकोली तर्फे उपजिल्हा रुग्णालय साकोली येथील रुग्णांना फळे व बिस्कीट वाटून विनम्र अभिवादन.

दि. 19/11/2021 सिख संप्रादायाचे संस्थापक प्रथम गुरुवर्य श्री गुरुनानक जी, भारताचे प्रथम महिला प्रधानमंत्री इंदिराजी गांधी, 1857 च्या राज्य क्रांतीची विरांगणा महाराणी लक्ष्मीबाई जयंती तद्वतच महाराष्ट्र नाभिक महामंडळ, मुंबई चे संस्थापक अध्यक्ष व शिक्षण महर्षी स्व. हनुमंतराव साळुंखे पुण्यस्मरण दिनानिमित्त चे औचित्य साधून आज 19/11/2021 ला म.ना.महामंडळाच्या सहकार्याने नाभिक युवा मंच व साकोली नगर नाभिक सलून व्यवसाय संघटना साकोली च्या वतीने उपजिल्हा रुग्णालय साकोली येथील रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.
सदरील उपजिल्हा रुग्णालय येथील प्रांगणात मौन ठेवून विनम्र अभिवादन करण्यात आले व विदर्भ विभागीय संघटन सचिव शरद उरकुडे द्वारा सदगुरु, विरांगणा, राष्ट्रीय नेत्या व सामाजिक क्षेत्रातील मान्य मान्यवरांच्या महान कार्यावर प्रकाश टाकण्यात आले.
सदर ठिकाणी कार्याच्या सफलतेसाठी भंडारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख मितारामजी पोवनकर, साकोली तालुका सचिव नागेश लांजेवार, नाभिक युवा मंच जिल्हा भंडारा चे सहसचिव व तालुका कार्याध्यक्ष डिगांबर सुर्यवंशी, साकोली तालुका महिला अध्यक्ष श्रीमती मायाताई लांजेवार, सदस्या प्रितीताई उरकुडे, निखिल लांजेवार, साकोली नगर नाभिक सलून व्यावसायिक सदस्य शैलेश सुर्यवंशी, जेष्ठ मार्गदर्शक दयारामजी उरकुडे, भैय्यालालजी उरकुडे यांनी प्रयास करीत कार्यक्रम यशस्वी संपन्न केले.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close