ताज्या घडामोडी
जन्मस्थान मंदिरात जे.बी.सिंग हैदराबाद यांच्या भजन कार्यक्रमाचे आयोजन
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परमपूज्य श्रीसाईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी येथे दिनांक 6 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत परम साई भक्त तथा सुप्रसिद्ध गायक श्री जे.बी.सिंग, हैदराबाद यांच्या सुश्राव्य भजन संध्याचे आयोजन श्रीसाई स्मारक समिती, पाथरीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अशी श्रीसाई स्मारक समिती पाथरीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.
अशी माहिती मंदिर प्रमुख सौ छायाताई कुलकर्णी यांनी दिली.