शेतात वीज पडून एक महिला ठार व एक गंभीर
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
नेरी येथून जवळच असलेल्या मोखाडा येथील एकनाथ पिसे यांच्या शेतात आज दिनांक 27 जुलै 2023 ला दुपारी चार ते पाच वाजता रोवणी करत असताना शेतात वीज कोसळून एक महिला ठार झाली व एक महिला गंभीर जखमी झाली. आज एकनाथ पिसे यांच्या शेतात रोवणी चे काम सुरू असल्यामुळे मेरी येथील काही मजूर महिला व पुरुष शेतात काम करण्यासाठी नेले. अचानक चार ते पाच वाजता गडगडात सर पावसाला सुरुवात झाली त्यामुळे काम करीत असतानाच शेतामध्ये वीज कोसळून एक सत्तर वर्षीय महिला जागीच गतप्राण झाली व तिची सून जखमी झाली. जखमीला ग्रामीण रुग्णालय चिमूर येथे भरती करण्यात आले तसेच मरण पावलेल्या महिलेचा पंचनामा करण्यासाठी पोलीस स्टेशन चिमूरची टीम घटनास्थळी हजर झाली व तहसील ऑफिसचे नेरी सर्कलचे मंडल अधिकारी कुंभरे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा सुरू केलेला आहे. जखमीचे नाव गीता प्रकाश पिसे वय ४५ असे आहे .