ताज्या घडामोडी

जखमी नागाला जीवनदान–दोन मुंगूस एका नागाची झुंज

तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर

जखमी नागावर उपचार करुन जंगलात सोडले

चिमुर तालुक्यातील केसलापुर येथे दोन मुंगूस व एक नाग यांच्या झुंजीचा थरार घडला. त्यात नाग मोठ्या प्रमाणात जखमी झाला. दोन मुंगूसा समोर नागाने आपली हार न पत्कारता एकाकी झुंज दिली. त्यात नागाच्या तोंडावर व तोंडाच्या आत जखमा पडल्या. पत्रकार विलास मोहीनकर यांनी पर्यावरण प्रेमी कवडु लोहकरे यांना फोन केला. तात्काळ सर्प मित्राची चमु दाखल झाली. आणि त्या जखमी नागावर उपचार करुन जंगलात सोडण्यात आले. यावेळी पर्यावरण प्रेमी कवडु लोहकरे, सर्पमित्र सुहास तुरानकर,, क्रिष्णा दडमल, राहुल जुमडे , आकाश गायकवाड आदी सर्पमित्र उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close