ताज्या घडामोडी

अखेर किमान आधारभूत धान खरेदीकरीता मुदतवाढ

शासन निर्णय परिपञक जारी

आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश.

तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी

खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये किमान आधारभूत किमत खरेदी योजने अंतर्गत शासकीय धान खरेदी केन्द्रावर ३१ जानेवारी २०२१ पर्यंतच धान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.माञ अनेक अडचणींमुळे नोंदणीकृत बहुसंख्य शेतक-यांचे अद्यापही धान खरेदी झाली नसल्याने संबंधित शेतक-यांना जबर आर्थिक फटका बसण्याची शक्यता लक्षात घेता अखेर किमान आधारभूत धान खरेदीकरीता मुदतवाढ देण्या संदर्भात शासन परिपञक निर्गमित करण्यात आले असुन यासाठी सातत्याने प्रयत्नशिल असलेल्या आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे. शासकिय स्तरावरुन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव तुषार तुंगार यांच्या स्वाक्षरीनिशी निर्गमित करण्यात आलेल्या शासन परिपञकात स्पष्ट करण्यात आले आहे की पणन हंगाम २०२१-२२ मध्ये धान खरेदी करीता आवश्यक त्या सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधीत धान खरेदी करण्याबाबत सुचना निर्गमित करुन त्यानुसार धान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले होते.
दरम्यान खरीप पणन हंगाम २०२१-२२ करीता केंन्द्र शासनाने १ कोटी ६० लाख क्विंटल धान खरेदी करण्याबाबतचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. माञ ३१ जानेवारी २०२२ अखेरपर्यंत सदर खरेदीचे उद्दिष्ट शिल्लक असल्याचे दिसून आले असुन अद्यापही ३० हजार शेतक-यांचे अनेक अडचणींमुळे वेळेत धान खरेदी झाली नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
शासकीय धान खरेदी केन्द्रावर नोंदणीकृत शेतक-यांना धान विक्री करीता संबंधित विभागाकडुन माहिती देण्यात आलेले शेतकरी व या व्यतिरिक्त जे शेतकरी ज्यांना अद्यापही माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे धान विक्री करीता येऊ शकले नाहीत अशा सर्व शेतक-यांकडुन खरीप पणन हंगाम २०२१-२२ मध्ये धान खरेदी करीता ८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तथापी सदर मुदतवाढी नंतरही मुदतवाढ आवश्यक असल्याची अभिकर्ता संस्थांची खाञी झाल्यास विवरणपञातील बाबनिहाय योग्य त्या कारणांसह तालुकानिहाय परिपूर्ण प्रस्ताव ४ फेब्रुवारी २०२२ पर्यंत शासनास सादर करण्याचे निर्देशही संबंधित विभागाच्या अधिका-यांना देण्यात आल्याने धान खरेदीचा मार्ग मोकळा झाला असुन यासाठी सातत्याने प्रयत्नशिल राहुन मुदतवाढ मिळवून दिल्याबद्दल आमदार कृष्णा गजबे यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close