प्रा.डॉ .कल्पना सांगोडेंचा “भारत समाज भूषण “पुरस्काराने सन्मान
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
शिवप्रसाद सदानंद जायस्वाल कॉलेज अर्जुनी मोरगाव येथे पहिले अखिल भारतीय मातोश्री जिजाऊ मराठी साहित्य संमेलन व पुरस्कार वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यात सामाजिक शैक्षणिक राजकीय व साहित्यिक कार्यासाठी गुणवंत, नामवंत, कीर्तिवंत बुद्धिवंत अशा विशिष्ट क्षेत्रात पारंगत असणाऱ्या लोकांची निवड करण्यात आली होती. विशेषता प्रा. डॉ .कल्पना सांगाडे यांचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा घेऊन तद्वतच त्यांचे समाजातील समाजकार्य विचारात घेऊन यावर्षीचा राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणारा भारत समाज भूषण पुरस्कार २०२४चा त्यांना बहाल करण्यात आला.
थाटात पार पडलेल्या या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याला सुपरिचित कवयित्री अंजनाबाई खुणे , कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे, प्राचार्य डॉ.ईश्वर मोहुर्ले, लूनकरजी चितलंगे दुर्गाप्रसाद संस्थेचे अध्यक्ष मुकेश जायस्वाल , टी. एन. बोरकर, प्रा. छाया बोरकर, प्राध्यापक वर्ग,या शिवाय साहित्यिक क्षेत्रातील अनेक नामवंत लेखक व कवी उपस्थित होते.
सदरहु पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र फोटो असे होते. मिळालेल्या या पुरस्काराने आपण अधिक भारावून गेले अशी प्रतिक्रिया कार्यक्रम संपल्यानंतर प्रा.डाॅ.कल्पना सांगोडे यांनी दिली.आयोजित या शानदार भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याला रसिक प्रेमींची मोठ्या संख्येंने उपस्थिती लाभली होती.