ताज्या घडामोडी

विठ्ठलवाडाच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी संगीता फरकडे यांची बिनविरोध निवड

ग्रामीण प्रतिनिधी:महेश शेंडे विठ्ठलवाडा

महात्मा गांधी तंटामुक्ती गाव समिती विठ्ठलवाडा अध्यक्षपदी संगीता प्रमोद फरकडे यांची ग्रामसभेत बिनविरोध निवड करण्यात आली. गोंडपिपरी तालुक्यातील ग्राम पंचायत विठ्ठलवाडा येथील ग्रामसभा काल दिनांक 15 नोव्हेंबर 2021 ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा येथे पार पडली.त्यात विविध विषयावर चर्चा करण्यात आली.त्यात महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यामध्ये विठ्ठलवाडा येथील एक सभ्य व्यक्तिमत्त्व म्हणून बाळगणारी संगीता प्रमोद फरकडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


ग्रामसभेला गावचे ग्रामसेवक तेलतुंबडे,सरपंच अंकुर मल्लेलवार,उपसरपंच पायल देवतळे,ग्राम पंचायत सदस्य शांताराम आलाम,रेखा रामटेके,दर्शना दुर्गे,विनोद मेश्राम,शुभम पिंपळकर,पोलिस पाटील शारदा पिंपळकर तसेच गावातील नागरिक व महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close