ताज्या घडामोडी

शेगांव (बु) पोलीस स्टेशन येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला रक्तदान व आरोग्य शिबीराने सुरुवात

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पोलीस स्टेशन शेगाव च्या वतीने 10 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज दिनाक 10 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन शेगाव येथे आझादी का अमृत महोत्सव निमित्त रक्तदान शिबिर व डोळे आणि दात तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर संजय सांगळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. शेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश मेश्राम,सहा.पोलीस निरीक्षक जाधव, सहा.पोलीस निरीक्षक सरोदे, सहा. पोलीस निरीक्षक पिरके यांची उपस्थिती होती.
रक्तदान शिबिरात एकूण 61 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर जवळपास 200 लोकांनी डोळे आणि दात तपासणी करून घेतली,यावेळी डोळे तज्ञ डॉ.लांबट आणि दंत तज्ञ डॉ.रामटेके यांनी यशस्वीपणे रुग्णांची तपासणी केली.रक्तदान आणि डोळे, दंत तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी पो.स्टे .शेगाव चे अधिकारी,कर्मचारी,पोलिस पाटील यांनी मोलाचे योगदान दिले. 12 ऑगस्ट रोजी शेगाव येथील नेहरू विद्यालयात विध्यार्थ्यांना महिला अत्याचार,सायबर गुन्हे व मार्ग सुरक्षा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे त्यानंतर तिरंगा प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.13 ऑगस्ट रोजी शेगाव पोलिस स्टेशन परिसरात , नवीन पळसगाव व खेमजई येथे वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन शेगाव येथील शिवम सभागृहात सकाळी 10 वाजता पासून करण्यात आले व शेगाव पोलीस स्टेशन परिसरात राष्ट्रपिता महात्मा फुले अभ्यासिकेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.15 ऑगस्ट रोजी हर घर झेंडा अभियाना अंतर्गत पोलीस स्टेशन शेगाव परिसरातून सकाळी 7:30 वाजता पासून तिरंगा मोटारसायकल रॅल काढण्यात येणार आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close