ताज्या घडामोडी
धनगर समाज संघर्ष समिती तर्फे वंदना बरडे सन्मानित

तालुका प्रतिनिधी:ग्यानीवंत गेडाम वरोरा
तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे अधीसेविका पदावर कार्यरत असलेल्या वंदना बरडे यांना धनगर समाज संघर्ष समितीद्वारे समाज जनजागृती व सामाजिक प्रश्नावर कार्य करीत असल्यामुळे त्यांच्या कार्याची नोंद घेऊन त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले आहे.
मागील अनेक वर्षापासून त्या धनगर समाज संघर्ष समिती द्वारे सामाजिक कार्य करीत असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत धनगर समाज संघर्ष समिती द्वारे सन्मानित करण्यात आल्याने विविध स्तरावरून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.