ताज्या घडामोडी

जनसामान्य जनतेची केलेली सेवेची उतराई जनता नायक पुरस्कार – ब्रह्माकुमारी मीरा दीदी

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी

दिनांक १७ सप्टेंबर २०२२ वार शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक सभागृह सोनपेठ या ठिकाणी १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस व जनता न्यूज चैनल च्या प्रथम वर्धापन दिनाचे तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव वर्ष अशा त्रिवेणी संगमाचे अवचित्य साधून सामाजिक ,शैक्षणिक ,राजकीय, धार्मिक, अशा विविध क्षेत्रातील गणमान्य वरांना जनता न्यूज चैनल च्या वतीने पुरस्कृत मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जनसामान्याच्या लेडी अवलिया म्हणजे ब्रह्मकुमारी मीरा दीदी असं म्हटलं तरी वावगे ठरणार नाही कारण प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्राउंड लेव्हलला उतरून काम करत गेली १८ वर्षापासून सोनपेठ शहरवासी यांचे तसेच सोनपेठ तालुक्यातील प्रत्येक शाळा धार्मिक मंदिर अशा विविध ठिकाणी भेटी देऊन व्यसनमुक्ती, तणाव मुक्ती, शाश्वत योगिक शेती, घराघरांमध्ये स्वर्ग बनवण्यासाठी मनशांती ची आवश्यकता, महिला सशक्तिकरण ,नैतिक मूल्य जागृती, पर्यावरण संवर्धन, वृक्षरोपण, ग्राम स्वच्छता अभियान, एक नाही अशा अनेक विविध क्षेत्रांमध्ये कार्य करून समाजाला नवीन दिशा देण्याचे काम वेळोवेळी मीरा दीदी आपल्या कर्तुत्वातून विचारातून साहित्यिक रचनेतून क्रांती घडवून आणण्याचे कार्य तरुण पिढीसाठी कायम ऊर्जा निर्माण करणारे विचार देत नवीन दिशा दाखवत अविरतपणे मीरा दीदी करत आहेत. जिथे समाज उपयोगी कार्य तिथे दीदी अशा तळमळीच्या कार्याची जनसामान्याचा आवाज जनता न्यूज २४ तास चैनल चे संपादक -आशिष मुंडे जी ,व उपसंपादक- कल्याण वाघमारे जी, व त्यांचे टीमने या कार्याची दखल घेऊन जनता नायक पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित केले. तसेच आपले मनोगत व्यक्त करत असताना ब्रह्माकुमारी मीरा दीदी यांनी जनता न्यूज चैनल चे वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या, पत्रकार हा जगाचा आरसा असून समाजाचा चौथा आधारस्तंभ आहे स्वतःचा जीव धोक्यात टाकून वेळोवेळी जनसामान्यांवर होणाऱ्या अन्यायावर मात करून न्याय मिळवून देण्याचे कार्य पत्रकार बांधव वेगवेगळ्या माध्यमातून करत असतात. तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांनी जनता न्यूज चैनल च्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर संदीप बोरकर पोलीस निरीक्षक सोनपेठ, सुभाष पवार तालुका वैद्यकीय अधिकारी सोनपेठ, ब्रह्माकुमारी मीरा दीदी देविदास वाडकर ब्रह्माकुमारीज संचालिका सोनपेठ, तसेच सोनपेठ शहरातील सर्व पत्रकार बंधू सामाजिक कार्यकर्ते , आर्केस्ट्रा कलाकार, व संपूर्ण महाराष्ट्रातील विविध ठिकाण ठिकाणावर उपस्थित गण मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमासाठी जनता न्यूज २४ तास चैनल च्या सर्व टीमने एक महिना पूर्वीपासून अविरतपणे मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close