‘ मॉडेल स्कूल ‘ पारडी ( ठवरे ) येथे नियोजन व सहविचार सभा संपन्न
तालुका प्रतिनिधी :कु. कल्यानी मुनघाटे नागभीड
चालू शैक्षणिक सत्रात जि . प . चंद्रपूर अंतर्गत पंचायत समिती नागभीड मधून जि . प . उच्च प्राथ . शाळा पारडी ( ठवरे ) ची ‘ मॉडेल स्कूल ‘ म्हणून निवड करण्यात आलेली आहे . ‘ मॉडेल स्कूल ‘ साठी आवश्यक निधी जिल्हा स्तरावरून शाळेला प्राप्त झाला असून खर्चाचे अनुषंगाने दिनांक 25 नोव्हेंबर 2021 ला जि . प . उच्च प्राथ . शाळा पारडी ( ठवरे ) येथे शाळा व्यवस्थापन समितीची नियोजन व सहविचार सभेचे आयोजन करण्यात आलेले होते . त्या अनुषंगाने नियोजन व सहविचार सभेला मार्गदर्शन करण्याकरीता मान . संजयभाऊ गजपूरे सदस्य , जि . प . चंद्रपूर तथा स्थायी समिती सदस्य व मान , दिलिपजी दोनोडे सरपंच , ग्रामपंचायत पारडी ( ठवरे ) यांची आवर्जून उपस्थिती होती .
त्या सभेत सर्व शिक्षकांनी आपापल्या संकल्पना मांडल्या व शासन निर्देशानुसार आवश्यक सामुग्रीची निवड करून खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला . यावेळी श्री . मालचंदजी खंडाळे मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रस्तावनेत ‘ मॉडेल स्कूल ‘ बाबत सविस्तर माहिती सांगितली . तसेच मान . संजयभाऊ गजपूरे यांनी शाळेला गावकऱ्यांच्या सहकार्याने भौतिक सुविधा कशा मिळवता येतील याबाबत चर्चा करून मार्गदर्शन केले . शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने मान . संजयभाऊ गजपूरे व मान . दिलिपजी दोनोडे शाल व श्रीफळ देवून यथोचित सत्कार करण्यात आला . सभेला मान , गोपालजी मस्के अध्यक्ष , शाळा व्यवस्थापन समिती , मान , गुरूदेवजी सारये , मान . नितीनजी शेंडे ग्रा . पं . सदस्य व श्री . अशोक शेंडे , श्री . दयाराम रामटेके , श्री . सुनिल हटवार , श्री . धनराज पडोळे , श्री . गौतम राऊत , श्री . सुबोध हजारे यांची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे संचालन श्री अशोक शेंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री . सुनिल हटवार यांनी केले .