विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत परभणी पुरुष क्रिकेट संघाला विजेतेपद

जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी, दि. 15—परभणी पुरुष क्रिकेट संघाला विभागीय महसूल व क्रीडा स्पर्धा, जालना येथे सलग दुसऱ्यांदा विजेतेपद प्राप्त
जालना येथे सुरू असलेल्या विभागीय महसूल व क्रीडा स्पर्धेत परभणी पुरुष क्रिकेट संघाने बीड क्रिकेट संघाचा आठ गडी राखून पराभव केला.. सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपदाचा मान परभणी पुरुष क्रिकेट संघाने पटकावला आहे
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली व मा अप्पर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे यांच्या नेतृत्वात संघाने लातूर जालना या बलाढ्य संघांचा पराभव करून अंतिम फेरीमध्ये बीड संघाचा दारुण पराभव केला.. परभणी संघाकडून सांघिक खेळाचा अत्यंत अप्रतिम नमुना संपूर्ण सामना दरम्यान बघावयास मिळाला.
दत्तू शेवाळे उपविभागीय अधिकारी परभणी,शिवाजी शिंदे, सामी,रामा कनले, दिनेश सरोदे, परळीकर इतर संघातील सर्वच खेळाडूंनी अत्यंत उत्कृष्टपणे कामगिरी केली.. सलामी फलंदाज श्री सामी यांनी झंझावती अर्धशतक झळकावले..
विजेता संघासोबत घेतलेल्या छायाचित्र जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे ,अपर जिल्हाधिकारी डॉ प्रताप काळे ,उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे ,उपविभागीय अधिकारी गंगाखेड जीवराज डापकर ,निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह खेळाडू उपस्थित होते.