भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली कार्यालयबांधकामाचा भूमिपूजन संपन्न
विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर,खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांची प्रमुख उपस्थिती.
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
एकात्म मानवता वादाचे शिल्पकार पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्ताचे औचित्य साधुन विनम्र अभिवादन करत आज भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली कार्यालय बांधकामाचा भूमिपूजन करण्यात आले.गडचिरोली जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी चा कार्यालय व्हावा.अशी अनेक वर्षापासून प्रतिक्षा होती.भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी अडचण निर्माण होत होती.पण आज जयंती च्या निमित्ताने आनंदाने जिल्हा भाजपा कार्यालय बांधकामाचे भूमिपूजन विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्रजी कोठेकर,खासदार अशोकजी नेते व जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, यांच्या प्रमुख हस्ते कुदळ मारुन भारत मातेचा व जय श्रीराम चा जयघोष करीत संपन्न झाला.
यावेळी प्रामुख्याने आमदार डॉ. देवराव होळी,आमदार कृष्णाजी गजबे,भाजपाचे जेष्ठ नेते तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे,माजी जिल्हाध्यक्ष किसन नागदेवते, लोकसभा संयोजक प्रमोद पिपरे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार,प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चा चे प्रकाश गेडाम, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जेष्ठ नेते रमेशजी भुरसे महीला प्रदेश चिटणीस रेखाताई डोळस, महिला जिल्हाध्यक्ष गिताताई हिंगे,जिल्हा महामंत्री योगीता पिपरे,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष बबलुभाई हुसैनी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,प्रकोष्ठ सहकार अध्यक्ष आशिष पिपरे, शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुकाध्यक्ष विलास पा. भांडेकर,तालुकाध्यक्षा लताताई पुघांटे,पल्लवी बारापात्रे तसेच मोठया संख्येनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भाजपा संघटनेचे काम प्रभावीपणे करावे.डॉ. उपेंद्रजी कोठेकर
जिल्हा भाजपा कार्यालय बांधकामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आटोपुन नवनिर्वाचित जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी बैठक शासकीय विश्रामगृह, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे आयोजित करण्यात आली.
या बैठकीला विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर यांनी भाजपा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील भविष्याच्या वाटचाली करीता शुभेच्छा देत ज्यांना आपल्या पदाची जबाबदारी दिली त्यांनी भाजपा संघटनेचा काम वाढवुन आपलं काम प्रभावीपणे करावे.अशा सुचना विदर्भ संघटन मंत्री डॉ.उपेंद्रजी कोठेकर यांनी या बैठकीप्रसंगी बोलत होते.
यावेळी खासदार अशोकजी नेते यांनी सुद्धा नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढिल भविष्याच्या शुभेच्छा देत, भाजपा संघटन मजबुत करण्यासंबंधी माहीती दिली.
या बैठकी प्रसंगी घर चलो अभियान अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील केलेल्या विकास कामांचे पत्रक वाटप करून प्रकाशित करण्यात आले.