माकोना ते सावरी मार्गाचे डांबरीकरणाची चौकशी करण्यास विलंब
प्रहार सेवक विनोद उमरे , मुरलीधर रामटेके यांच्या आरोप
तालुका प्रतिनिधी : मंगेश शेंडे चिमुर
चिमूर तालुक्यातील माकोना ते सावरी डांबरीकरणाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप प्रहार सेवक यांनी केला होता तरी सदर कामांची चौकशी करुन कंत्राटदारावर व निकृष्ट दर्जाचे काम पास करणाऱ्या इंजिनियर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व आझाद समाज पार्टी वतिने निवेदनातून करण्यात आली होती , केलेल्या कारवाईची प्रतिलिपी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रहार सेवक विनोद उमरे यांना पुरविण्यात यावी अशी सुध्दा मागणी निवेदनातून करण्यात आली होती .तरी ४०ते ४५ दिवस होऊनही कसल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही असा आरोप प्रहार सेवक, विनोद उमरे, मुरलीधर रामटेके, प्रहार सेवक,मिलिंद खोब्रागडे, लोकेश खामनकर, आझाद समाज पार्टी चे अध्यक्ष जेगदिशभाऊ मेश्राम यांनी केला आहे.