ताज्या घडामोडी

सोनपेठ तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या १.५ कोटी निधीच्या कामांचे भूमिपूजन

पाथरी विधान सभा मतदार संघातील कर्तव्य दक्ष आमदार श्री.सूरेशराव वरपुडकर साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने निधीस मंजुरी.

जिल्हा प्रतिनिधी : अहमद अन्सारी परभणी

सोनपेठ तालुक्यात आ.सुरेशराव वरपुडकर यांच्या विशेष प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांसाठी १.५ कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. या कामांचे भूमिपूजन आज महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या सरचिटणीस तथा पाथरी विधान सभा मतदार संघातील आदरणीय सौ प्रेरणा ताई समशेर भै या वरपुडकर याच्या हस्ते संपन्न झाले.

भूमिपूजन झालेल्या कामांमध्ये सोनपेठ-गंगाखेड ( शेळगाव मार्ग ) या रस्त्याची दुरुस्ती, डांबरीकरण तसेच दोन नवीन पुल, पुरामुळे नादुरुस्त झालेल्या कामांचे दुरुस्ती यामध्ये सोनपेठ – गंगाखेड ( नरवडी मार्ग ) या रस्त्यावरील नवीन पुल व जुन्या पुलांची दुरुस्ती या कामांचे उद्घाटन करण्यात आले.

विटा-लासिना-उक्कडगाव-शिर्शी या गोदाकाठच्या १७ की.मी. रस्त्याचे काम आ.सुरेशराव वरपुडकर साहेबांच्या प्रयत्नातून आंदाजपत्रकासह मुख्यमंत्री सडक योजनेतून प्रस्तावित केले असून हे काम लवकरच सुरू होणार असून सोनपेठ तालुक्यातील विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही आसा विश्वास यावेळी उपस्थितांना आदरणीय सौ प्रेरणा ताई समशेर भै या वरपुडकर यांनी दिला

यावेळी ताई सोबत भूमिपूजन प्रसंगी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष सावंत, तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ धोंडगे, उपअभियंता श्री.बडे, कार्यकारी अभियंता हरदास, जनार्दन डुकरे, रावसाहेब मोकशे, जगन्नाथ कोलते, सुमित पवार, राजेभाऊ आंभोरे, राजू सौदागर, शुभम कदम व तालुक्यातील सरपंच चेअरमन व पदाधिकारी उपस्थित होते.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close